नॉटींगहम | भारत-इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून (१२ जुलै) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका सुरु होत आहे.
या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज नॉटींगहम येथिल टेंटब्रीज क्रिकेट मैदानावर होणार आहे.
या पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय संघ इंग्लंडला एकदिवसीय मालिकेत नक्कीच आव्हन देईल असे इंग्लिश फलंदाज जो रुट म्हणाला. तसेच भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तुलाना होऊ शकत नाही असेही वक्तव्य त्याने केले.
“गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आला आहे. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यात भारताने एकदिवसीय मालिका जिंकली होती. २०१४ चा भारतीय संघ आणि आताचा भारतीय संघ यांच्यात खूप फरक आहे. भारता विरुद्धच्या या मालिकेत आम्हाला आमच्या एकदिवसीय संघाच्या ताकदीचा अंदाज येईल.”
“आम्ही नुकतेच ऑस्ट्रेलियन संघाबरोबर एकदिवसीय मालिका खेळलो. मात्र ऑस्ट्रेलियन संघ आणि भारत यांच्यात खूप फरक आहे. आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळ करुन आमच्या खेळात आणखी सुधारणा घडवून आणल्या तर आम्हाला पराभूत करणे कोणत्याही संघाला अवघड असेल.” या शब्दात रुटने भारत आणि ऑस्ट्रेलिया मधील फरक स्पष्ट केला.
भारताने नुकत्याच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत इंग्लडला २-१ असे पराभूत केले आहे.
मात्र गेल्या काही काळात एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इंग्लंडने देखील एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सूरमा चित्रपट पाहिल्यावर मास्टर ब्लास्टर सचिनकडून संदीप सिंगवर कौतूकाचा वर्षाव
-कोलकाता नाईट रायडर्सने केली मोठी घोषणा, हा खेळाडू आपल्या ताफ्यात