विराट कोहलीने गेल्या काही वर्षात एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून क्रिकेट जगतावर वेगळीच छाप सोडली आहे.
मात्र आता कोहलीसमोर बलाढ्य इंग्लंड संघाचे कठीण आव्हान असणार आहे.
भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला एक ऑगस्टपासून सुरवात होत आहे.
त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने इंग्लंड संघाला विराट पासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
डेल स्टेनने नुकतेत विराट कोहली आणि भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर आपले मत व्यक्त केले आहे.
“या कसोटी मालिकेत विराट चांगली कामगिरी करेल याचा मला विश्वास आहे. त्याला कमी लेखून काही लोक मोठी चूक करत आहेत. ज्या ज्या वेळी तुम्ही त्याला कमी लेखाल किंवा त्याच्यावर टीका कराल त्यावेळी तो त्याच्या क्षमतेपेक्षा दुप्पट कामगिरी करतो.” असे स्टेन विराटबद्दल म्हणाला.
पुढे स्टेनने विराट चांगला कर्णधार असल्याचेही मत व्यक्त केले.
“विराटची वृत्ती आक्रमक असल्याने त्याचे प्रतिबिंब त्याच्या कर्णधार पदाच्या शैलीवरही पडते. विराट कायमच जिंकण्याच्या इराद्याने खेळत असतो आणि जिंकण्यासाठी त्याच्या खेळाडूंकडून कशी कामगिरी करुन घ्यायची हे त्याला चांगलेच माहित आहे.” असे डेल स्टेन म्हणाला.
२०१५ साली विराटने एमएस धोनीकडून कसोटी कर्णधार पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्याने भारताचे ३५ सामन्यात नेतृत्व केले आहे. या ३५ कसोटी सामन्यांपैकी भारतीय संघाने २० विजय मिळवले आहेत.
या कसोटी मालिकेत विराटला त्याच्या वैयक्तिक कामगिरी बरोबरच भारतीय संघाचीही इंग्लंडमधील कामगिरी सुधारण्याचे दुहेरी आव्हान असणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-मिसेस गायतोंडे आहे सेक्रेड गेम्समधील धोनीचं आवडत पात्र
-क्रिकेटमधील आरक्षणावरुन मोहम्मद कैफ संतापला