यूएईमध्ये होणाऱ्या टी-10 लीगच्या दुसऱ्या मोसमाला लवकरच सुरवात होत आहे.
यामध्ये भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागला मराठा अरेबियन्स संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहे.
याची माहिती मराठा अरेबियन्स संघाचे सह-मालक परवेझ खान यांनी दिली.
सेहवाग सध्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा प्रशिक्षक आहे. तसेच सेहवागला प्रशिक्षणाचा अनुभव असल्याने त्याला प्राधान्य देण्यात आल्याचे परवेझ खान यांनी सांगितले.
गेल्या मोसमात सेहवाग मराठा अरेबियन्सचा कर्णधार होता. त्यामध्ये त्याची वैयक्तीक कामगिरी चांगली झाली नव्हती.
पहिल्या सामन्यात सेहवाग शून्यावर बाद झाला होता तर दुसऱ्या सामन्यात त्याने फलंदाजी केली नव्हती.
या दोन सामन्यानंतर सेहवाग टी-10 लीगमधील उर्वरित सामन्यांमध्ये खेळला नव्हता.
या मोसमात मराठा अरेबियन्सने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-मार्टिन गप्टीलने केला टी२० मधील मोठा कारनामा
-वाढदिवस विशेष- गॅरी सोबर्सबद्दल कधीही न ऐकलेल्या ५ गोष्टी