इंग्लंड मधील शेफर्ड नीएम केंट क्रिकेट लीगमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधील नीचांकी धावसंख्या नोदंवली गेली आहे.
शनिवारी (21 जुलै) बेक्सली येथील मॅनेर वे क्रिकेट मैदानावर बेकेनहम सीसी विरुद्ध बेक्सली सीसी यांच्यात एकदिवसीय सामना झाला.
या सामन्यात बेक्सली सीसीने बेकेनहम सीसी संघाला 11.2 षटकात अवघ्या 18 धावांमध्ये आॅलआऊट केले.
यामध्ये बेक्सली सीसीच्या कॅल्युम मॅक्लीऑडने 6 तर जेसॉन बेनने 4 बळी मिळवले.
बेक्सली सीसीने या 18 धावांचा पाठलाग करण्यासाठी अवघ्या 12 मिनिटांचा वेळ घेतला.
बेक्सली सीसीने 3.3 षटकात बिनबाद 22 धावा करत या नाट्य़मय सामन्यात विजय मिळवला.
बेकेनहम सीसी क्रिकेट क्लबच्या 152 वर्षाच्या इतिहासत प्रथमच इतकी निचांकी धावसंख्या नोंदवली गेली.
महत्त्वाच्या बातम्या-
-भावा अपेक्षा आहे, तुझा हरवलेला दात तुला पुन्हा मिळेल!
-बीसीसीयने बंदी घातलेल्या खेळाडूलाच दिली संघात संधी, चुक समजताच काय केले पहाच