क्रीडा जगतात अनेक फ्रांचायझी लीग स्पर्धा होत असतात. या स्पर्धांमधील काही संघांची नावेही आकर्षिक करणारी असतात. साधारणत: चाहत्यांना जवळचे वाटेल अशी नावे संघांची ठेवली जातात.
काही संघतर त्यांच्या नावापुढे एका प्राण्याचेही नाव जोडतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला कांगारु, न्यूझीलंड संघाला किवी असे म्हटले जाते. परंतू ती त्यांची अधिकृत नावे नाहीत. पण असे काही संघ आहेत ज्यांच्या अधिकृत नावामध्ये एखाद्या प्राण्याचा उल्लेख आहे. अशाच काही संघांचा घेतलेला हा आढावा –
१. कराची झेब्राज: तसे पहायला गेले तर कराची शहराचा आणि झेब्रा यांचा काहीच संबंध नाही. पण संघाचे नाव फॅन्सी वाटावे म्हणून संघाच्या नावात झेब्रा या प्राण्यालाही स्थान देण्यात आले. पाकिस्तानमधील सिंध, कराची येथील टी२० आणि अ दर्जाचे क्रिकेट खेळणारा हा संघ आहे.
२. अमो शार्क्स: अफगाणिस्तान सारखा देश आणि शार्कसारखा मोठा जलचर प्राणी यांचा तसा दूरदूरचाही संबंध नाही. पण तरी शार्क हे नाव संघाशी जोडले गेले आहे. हा संघ आफगाणिस्तान टी२० लीगमध्ये खेळतो.
३. बेरिसल बुल्स: बेरिसल आणि बुल्स यांचा नक्की काय संबंध आहे हे स्पष्ट झालेले नाही. पण कदाचित शिकागो बुल्सची प्रेरणा घेऊन बुल्स हे नाव संघाशी जोडले गेले असू शकते. बुल्सला मराठीत बैल असे म्हणतात.
४. केप कोब्राज – केपटाऊनमधील हा संघ आहे. कोब्राची गणना विषारी सर्पांमध्ये केली जाते. त्यामुळे कदाचित कोब्रा हे नाव संघाशी जोडलेले असावे. पण आफ्रिकेत शक्यतो मांबा या जातीचे साप आढळतात. पण कदाचित केप मांबा हे नाव तितकेसे प्रभावी वाटत नसावे म्हणून केप कोब्राज हे नाव ठेवले असू शकते.
५. हुबळी टायगर्स – टायगर म्हणजेच वाघ हा एक हिंस्त्रक जंगली प्राणी आहे. हुबळी संघाशी टायगर हे नाव जोडण्यामागे संघाचे मालक सुशील जिंदाल यांनी कारण सांगितले आहे. त्यांनी सांगितले की ‘मला वन्यजीवन आवडते आणि मला विशेषतः वाघ आवडतात, म्हणूनच मी माझ्या टीमचे नाव हुबली टायगर ठेवले.’
६. पाकिस्तान इग्लेट्स – न्यायमूर्ती ए.आर. कॉर्नेलिस यांनी उदात्त हेतूने इगलेट्सची स्थापना केली होती. याद्वारे पाकिस्तानी युवा खेळाडूंनी १९५० च्या दशकात आणि नंतरही ब्रिटीश बेटांचा दौरा केला होता. त्याचमुळे कदाचित इगल म्हणजेच गरुड या उंच उडणाऱ्या पक्षाची प्रेरणा घेऊन हे नाव ठेवलेले असू शकते.
७. एफएटीए चिताज – एफएटीए म्हणजेच पाकिस्तानमधील फेडरली ऍडमिनिस्टरेड ट्रायबल एरिया. पण या क्षेत्राचा आणि चित्ता या प्राण्याचा काहीच संबंध नाही. पण तरीही चपळ असणारा प्राणी म्हणून कदाचित त्याचे नाव संघाशी जोडलेले असावे.
८. क्वेटा बिअर्स – बिअर म्हणजेच अस्वल. आता अस्वल आणि पाकिस्तानमधील क्वेटा या शहराचा काय संबंध आहे, हे माहित नाही. पण तरीही बिअर हे नाव या शहराशी निगडीत असलेल्या संघाशी जोडण्यात आले आहे.
ट्रेडिंग घडामोडी –
क्रिकेटमध्ये जेवढं नाही कमावलं तेवढं मैदानाबाहरे या क्रिकेटरने गमावलं
कोरोनाविरुद्धच्या लढाईत एमएस धोनी आला पुणेकरांच्या मदतीला धावुन
जर आयपीएल झाली नाही तर मी कंगाल होईल
हे ४ खेळाडू जेव्हा निवृत्त होतील तेव्हा संपुर्ण देश रडेल
४ वर्षांपुर्वी कोहलीचे त्याला किंग कोहली का म्हणतात याच प्रात्यक्षिक दिलं होतं