जगभरात टी२० क्रिकेटच्या अनेक लीग खेळल्या जात आहेत. त्यामध्ये खेळाडूही फलंदाजीत आणि गोलंदाजीत त्यांचे कौशल्य दाखवत आहेत. त्यातच फलंदाज वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स मारून आणि गोलंदाजांची अनोख्या स्टाईलच्या चेंडू टाकण्याच्या प्रकाराने प्रेक्षकांना हैराण केले आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये फलंदाजांचे हेलिकॉप्टर शॉट, (दिलशानचा) स्कूप शॉट, रिव्हर्स स्विप शॉट, स्विचहिट शॉट प्रसिद्ध आहेत. अशा काही शॉट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात. नुकत्याच एका सामन्यात फलंदाजाने खेळलेल्या एका विचित्र शॉटचा व्हि़डीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या शॉटला काय म्हणावे हे आता तुम्हीच ठरवा. यामध्ये फलंदाजाने उलट्या बॅटने चेंडू मारत चौकार भिरकावला आहे.
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी२० ब्लास्ट (T20 Blast) स्पर्धेमध्ये ग्रेस रोड ग्राऊंड, लिसेस्टर येथे डर्बीशायर विरुद्ध लिसेस्टरशायर यांच्यात झालेल्या सामन्यात हा शॉट मारण्यात आला. त्याचा व्हिडिओ डर्बीशायरने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेयर केला आहे.
डर्बीशायरच्या (Derbyshire) लेऊस डू प्लूयने लिसेस्टरशायर (Liecestershire) संघाविरुद्ध एका वेगळ्याच अंदाजात फलंदाजी केली. त्याने फिरकीपटू स्कॉट स्टीलच्या गोलंदाजीवर उलट्या बॅटने चेंडू मारला. हा चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेपार गेला.
Everyone: Show them the maker's name! 🏏
Leus du Plooy: Like this? 🤔A 360-degree player of a different kind 🤯#OneClubOurCounty #ThisIsDerbyshire pic.twitter.com/JeInarSKVj
— Derbyshire CCC (@DerbyshireCCC) May 29, 2022
हा शॉट पाहून फलंदाजासोबत विरोधी संघ देखील हैराण झाला आहे. समालोचक तर हा शॉट पाहून कोड्यातच पडले. “बॅटच्या मागून शॉट असा प्रकार रोज नाही बघायला मिळत,” असे चकीत झालेल्या समालोचकांनी म्हटले आहे.
या सामन्यात लिसेस्टरशायरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करत डर्बीशायरने २० षटकात ५ विकेट्स गमावत १५९ धावा केल्या. यामध्ये डू प्लूयने २९ चेंडूत ४ चौकार मारत नाबाद ३८ धावा केल्या, तर लक्ष्याचा पाठलाग करत लिसेस्टरशायर ८९ धावा करत सर्वबाद झाली. हा सामना डर्बीशायरने ७० धावांनी जिंकला.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पर्पल कॅप जिंकणाऱ्या पठ्ठ्याला त्यादिवशी खाली बसवलं गेलं, नाहीतर दिल्ली आयपीएल चॅम्पियन बनली असती
कोणी संधी देता का संधी! ‘या’ ५ खेळाडूंना आयपीएल २०२२मध्ये बसावे लागले बाकावरच
पुढच्या आयपीएलमध्ये सीएसके काय बदल करणार? खूपच मोठीये यादी