भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी बामिकासोबत यूएईमधून भारतात परतले आहेत. यावर्षी यूएईत आयोजित केलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा प्रवास ८ नोव्हेंबरला सुपर १२ फेरीनंतर संपला आणि त्यानंतर विराट त्याच्या कुटुंबासोबत मायदेशात परतला आहे. विराट आणि त्याच्या कुटुंबाला मुंबईतील विमानतळापर पाहिले गेले आहे.
भारतीय संघ मागच्या बऱ्याच दिवसांपासून एकापाठोपाठ एक मालिका खेळत आहे आणि खेळाडू बायो बबलमध्ये आहेत. याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेसाठी विराटला विश्रांती देण्यात आली आहे.
विराट भारतात परतल्यानंतर त्याच्या कुटुंबासोबत काही दिवस घालावणार आहे. विराट आणि त्याच्या कुटुंबाचे मुंबई विमानतळावरी व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.
#ViratKohli & #AnushkaSharma back from Dubai 💕📸✈️ @imVkohli @AnushkaSharma @viralbhayani77 pic.twitter.com/WRSxJKbgFj
— Viral Bhayani (@viralbhayani77) November 13, 2021
भारतीय संघाला येणाऱ्या काळात लागोपाठ वेगवेगळ्या दैशांचे दौरे आणि मायदेशातील मालिका खेळायच्या आहेत. याच पार्श्वभूमीवर विराट कोली न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेदरम्यान विश्रांतीवर देण्यात आली आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठीही विराट उपस्थित नसणार आहे. मात्र, मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी विराट संघासोबत सामील होईल.
तत्पूर्वी, विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी टी२० आंतरराष्ट्रीय संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. अशात न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपासून भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आले आहे. तसेच भारतीय माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचाही विश्वचषकानंतर संघासोबतचा करार संपला आहे. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेपासून दिग्गज राहुल द्रविड संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडतील.
दरम्यान, या टी-२० मालिकेतील पहिसा सामना १७ नोव्हेंबरला जयपुरला खेळला जाईल. तसेच दुसरा १९ नोव्हेंबरला रांची आणि तिसरा २१ नोव्हेंबरला कोलकातामध्ये खेळला जाईल. टी२० मालिकेनंतर कसोटी मालिका खेळली जाणार आहे, ज्यामधील पहिला सामना २५ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कानपूरमध्ये खेळला जईल. तसेच दुसरा सामना ३-७ डिसेंबर दरम्यान मुंबईमध्ये खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करुन देऊ शकतात पैसा वसूल!
‘तोपर्यंत मी संघाच्या आठवणी जपत राहील’, विराटसेनेला सोडताना माजी प्रशिक्षक शास्त्री झाले भावुक
Video: ‘द ग्रेट’ खलीने फुटबॉलने खेळले क्रिकेट; चाहते म्हणाले, ‘आभाळाला छिद्र पडेल’