---Advertisement---

फोर्ब्स मासिकात ‘या’ भारतीय खेळाडूने मिळवले सलग दुसऱ्या वर्षी स्थान

On: रविवार, मे 31, 2020 2:09 PM
---Advertisement---

मुंबई । फोर्ब्स मासिकाने २०२० या वर्षात जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्यांदाच एका टेनिस खेळाडूने पहिले स्थान मिळविले. जाहीर केलेल्या यादीत बहुतांशी खेळाडू हे फुटबॉलपटू आहेत. जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीमध्ये एकमेव भारतीय खेळाडू विराट कोहलीचे नाव आहे.

विराट कोहली २.६ करोड डॉलर म्हणजे जवळपास १९६ कोटी रुपयांची कमाई करतो. १०० खेळाडूंच्या यादीत विराट ६६ व्या स्थानावर आहे. मागील वर्षी तो १०० व्या तर २०१८ साली ६३ व्या स्थानी होता. कोहली जाहिरातीच्या माध्यमातून २.४ कोटी डॉलरची कमाई केली तर २० लाख डाॅलर वेतन आणि पुरस्कारातून मिळवले.

मागील वर्षी त्याने २.५ कोटी डॉलरची कमाई केली होती. तर २०१८ साली त्याने २.४ कोटी डॉलरची कमाई केली होती. शंभर खेळाडूंच्या यादीत विराट कोहली सलग दुसऱ्या वर्षी स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे.

३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच एका टेनिस खेळाडू या यादीत पहिले स्थान मिळवले. २० ग्रॅण्ड स्लॅम विजेता रॉजर फेडररने (१०६.३ मिलियन डॉलर) ८०० कोटी पेक्षा जास्त कमाई केली आहे. त्यामुळे तो यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्विझरलँडच्या या दिग्गज खेळाडूने १९९० नंतर या यादीत पहिले स्थान मिळणारा टेनिस खेळाडू आहे.

फोर्ब्सच्या यादीत फुटबॉल खेळाडूंचा दबदबा

फोर्ब्सने शुक्रवारी जाहीर केलेल्या, या यादीत फुटबॉल खेळाडूंचा दबदबा असून यात क्रिस्टियानो रोनाल्डो (१०५ मिलियन डॉलर), लियोनेल मेस्सी (१०४ मिलियन डॉलर), नेमार (९५.५ मिलियन डॉलर) आणि अमेरिकेचा बास्केटबॉल खिलाड़ी लेब्रॉन जेम्स (८८.२मिलियन डॉलर) हे पहिल्या पाच खेळाडूंमध्ये आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---