क्रिकेटच्या खेळात मंकडींग हा शब्द नवा नाही.भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या वनडे सामन्यात यजमान इंग्लंडचा (ENGvsIND) पराभव केला. लॉर्ड्सवर झालेल्या या सामन्यात भारताची अष्टपैलू दीप्ती शर्मा (Deepti Sharma)हिने मंकडींग करत चार्ली डीन हिला बाद करत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. भारताने ही वनडे मालिका 3-0 अशी जिंकली. यामुळे पुन्हा एकदा मंकडींग शब्द चर्चेत आला आहे. तर सध्या क्रिकेट वर्तुळात नेमके पहिल्यांदा कोणी असे फलंदाजाला धावबाद केले याबाबत चर्चा सुरू आहे.
ही धावबाद पद्धत अनौपचारिकपणे मंकडींग (Mankding) म्हणून ओळखली जाते. 1948 मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला तेव्हा क्रिकेटमध्ये हा शब्द पहिल्यांदा वापरला गेला. या दौऱ्यात भारताचे अष्टपैलू खेळाडू विनू मंकड (Vinoo Mankad) यांनी पहिल्यांदा बिल ब्राऊन यांना विवादित पद्धतीने बाद केले होते. तेव्हापासून क्रिकेटमध्ये अशा रनआऊटला मंकडींग म्हणत. यामध्ये नॉन स्ट्राईकरचा फलंदाज चेंडू टाकण्याआधी क्रिजच्या बाहेर गेला तेव्हा गोलंदाज त्याला धावबाद करतो.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) या नियमांमध्ये बदल केला आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू केला जाणार आहे. त्यानुसार नॉन स्ट्राईकरचा फलंदाज गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी क्रिजच्या बाहेर जात असेल, अशावेळी गोलंदाजाने त्या फलंदाजाला बाद केले तर ते अनाधिकृत ठरवले जात होते. आता त्याला धावबाद म्हटले जाणार आहे.
विनू मंकड यांनी भारताकडून 44 कसोटी सामन्यात 2109 धावा केल्या. यामध्ये 5 शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्यांनी 162 विकेट्स ही घेतल्या. त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये 11591 धावा आणि 782 विकेट्स घेतल्या.
भारतीय महिला संघाने कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिच्या नेतृत्वाखाली इतिहास घडवला आहे. भारताचा हा इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये पहिलाच मालिका विजय आहे. त्याचबरोबर त्यांनी इंग्लंडला वनडेमध्ये क्लीन स्वीप करण्याचीही ही त्यांची पहिलीच वेळ आहे. हा सामना भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvAUS: क्रिकेटच्या मैदानातही झळकले ’50 खोके एकदम ओके’चे बॅनर, वाचा सविस्तर
झूलनला ‘परफेक्ट फेअरवेल’! सहकारी खेळाडूंनी खांद्यावर घेत दिली मानवंदना; पाहा व्हिडिओ