आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशीपच्या अंतिम सामन्याला आता केवळ ९ दिवस राहिले आहेत. १८ जुन ते २२ जुन दरम्यान इंग्लंडमधील Southampton येथील द रोझ बाऊल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. विराट कोहलीची टीम इंडिया विजेतेपदासाठी केन विलियमसनच्या न्यूझीलंड संघाशी दोन हात करणार आहे. भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी इंग्लंडमध्ये पोहचला असून संघाने सरावदेखील सुरु केला आहे तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्धच कसोटी मालिकेत व्यस्त आहे.
क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच कसोटी क्रिकेट प्रकाराचा विश्वचषक होत आहे. यामुळे या सामन्याला एक वेगळेच महत्त्व आले आहे. यामुळे या सामन्यात जबरदस्त कामगिरी कोण करतोय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत या स्पर्धेच्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा केलेल्या खेळाडूंच्या कामगिरीचा आज आपण लेखाजोखा या लेखात पाहणार आहोत, त्यामुळे तुम्हाला फलंदाजांच्या कामगिरीचा एकंदरित अंदाज येईल.
वर्ल्ड टेस्ट चँपियनशीपमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१.डेव्हिड वॉर्नर
गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशीप स्पर्धेत सर्वात जास्त धावा ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या बॅटमधून निघाल्या आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर वॉर्नरने २०१९ला पाकिस्तानविरुद्ध ॲडिलेड कसोटीतील एका डावात ३३५ धावांचा डोंगर उभा केला. वर्ल्ड टेस्ट चँपियनशीप स्पर्धेत खेळलेली सर्वात मोठी खेळी होती.
२.जॅक क्रोवली
वर्ल्ड टेस्ट चँपियनशीप स्पर्धेत दुसऱ्या स्थानी इंग्लंडचा खेळाडू जॅक क्रोवली आहे. त्याने आजवर इंग्लंड संघासाठी १२ कसोटी सामने खेळले आहेत. दरम्यान,जॅक क्रोवलीने कारकिर्दीत आतापर्यंत एकच शतक केले आहे आणि विशेष म्हणजे ते शतक त्याने द्वितशकाच्या रुपात ठोकले आहे. पाकिस्तान विरुद्ध जॅकने २०२०मध्ये झालेल्या कसोटीत साउथम्प्टन येथे २६७ धावांची खेळी खेळली. आता याच मैदानावर स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे, परंतू या सामन्यात तो किंवा त्याचा इंग्लंड संघ मात्र खेळताना दिसणार नाही.
३.विराट कोहली
या यादीत तिसऱ्या स्थानी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीने आजवर ७वेळा २०० धावांचा टप्पा गाठला आहे. परंतू वर्ल्ड टेस्ट चँपियनशीपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१९मध्ये झालेल्या कसोटी सामन्यात त्याने नाबाद २५४ धावांची खेळी केली होती. वर्ल्ड टेस्ट चँपियनशीप स्पर्धेत कोहलीच्या फलंदाजीतून निघालेली हि सर्वोत्तम खेळी तसेच कोहलीच्या कारकिर्दीतीलही हि सर्वोत्तम खेळी राहिली आहे. हा सामना पुण्यात झाला होता. विशेष म्हणजे हा सामना भारतीय संघाने सहज जिंकला होता.
४. केन विलीयमसन
या यादीच्या चौथ्या स्थानी न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलीयमसन आहे. केन विलीयमसनने डिसेंबर २०२० मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध हेमिलीटन येथे २५१ धावांची मोठी खेळी केली.त्या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्या सामन्यात खेळपट्टी पूर्णपणे हिरवीगार होती आणि उसळती होती. अश्या खेळपट्टीवर केन विलीयमसनने २५१ धावांची चांगली खेळी केली होती.
५. दिमुथ करुणारत्ने
श्रीलंका संघाचा कसोटी कर्णधार दिमुथ करुणारत्ने सुद्धा या यादीत मागे नाही. त्याने बांगलादेशविरुद्ध २०२०मध्ये पल्लाकेले स्टेडीयममध्ये २४४ धावांची खेळी केली होती. श्रीलंका संघाकडून वर्ल्ड टेस्ट चँपियनशीपमध्ये द्विशतकी खेळी करणारा एकमेव फलंदाज आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्या कसोटी चॅम्पियनशीप विजयासाठी कर्णधार विराटला कट्टर विरोधी संघातून ‘हा’ महत्त्वाचा सल्ला
स्मिथ-मॅक्सवेलसह दिग्गज खेळाडू घेऊ शकतात ‘या’ महत्त्वाच्या दौऱ्यातून माघार
अश्विनच्या प्रत्युत्तरावर मांजरेकरांनी त्याचीच घेतली फिरकी; म्हणाले, ‘अशी आकडेवारी माझंही मन दुखवते’