इंडियन प्रीमिअर लीग 2023 संपल्यानंतर नव्या चर्चेला उधान आले. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. आकाशने त्या ट्विटमध्ये राहुल गांधींना सल्ला दिला आहे. मात्र, त्या ट्विटमध्ये आकाशने स्पष्टपणे राहुल गांधींचे नाव घेतले नाही. तर चला जाणून घेऊ नेमके प्रकरण आहे तरी काय.
चोप्रा त्याच्या ट्विट मध्ये म्हणाले की, भारत देशात स्वतःची लढाई लढली पाहिजे असाही त्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. अनेक लोक आकाशच्या ट्विटला समर्थन देत आहेत आणि अनेकांनी त्याच्यावर टीकाही केली आहे. मात्र, ट्विटरवरील काही युजर्सनी आकाशला राजकारणात येऊ नका, असा सल्लाही दिला. तर काहींनी त्याला भाजपचे प्रवक्ते देखील म्हटले.
तुम्ही ट्विट पाहिले का
आकाशने (Former Indian Cricket Team Player) ट्विट मध्ये असे लिहिले की, ”मी इतर कोणत्याही देशाच्या विरोधी नेत्याला भारतात येऊन स्वत:च्या देशाची प्रतिमा खराब करताना अद्याप पाहिलेले नाही. तुम्ही तुमच्या लढाया तुमच्या देशात लढायला हव्यात. निवडणुकीच्या वेळी मतदारांना ठरवू द्या ते लोकशाहीचे मर्म असू शकत नाही का?”
आकाश चोप्राने असे ट्विट का केले?
याचे कारण असे की, राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत गांधींनी सत्ताधारी पक्ष भाजपवर निशाणा साधला आहे. यानंतर टीकाकारांनाही गांधींवर निशाणा साधण्याची संधी मिळाली. अशातच गांधींबाबत सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ सुरू आहे. यामुळेच आकाशनेही राहुल गांधींवर न बोलता ट्विट केले. मात्र, त्याच्या या ट्विटनंतर अनेक यूजर्सनी चोप्राला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. एकाने प्रतिक्रिया दिली की, क्रिकेट एक्स्पर्ट झाल्यानंतर तू आता प्रोपगंडा एक्स्पर्ट बनण्याची तयारी करत आहेस का?. दुसरीकडे काहींनी लिहिले की, तुम्ही राहुल गांधींबद्दल बोलत आहात, पण तुम्ही आतापर्यंत कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ काही बोललात का? (Tweet Viral)
(Cricketer Aakash Chopra Cryptic Tweet Take Dig On Congress Leader Rahul Gandhi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
“आयपीएल खेळल्याचा WTC फायनलमध्ये फायदाच”, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले कारण
“रोहितला हलक्यात घेऊ नका”, WTC फायनलआधी दिग्गजाने व्यक्त केला विश्वास