मंगळवारी (दि. 16 एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 22वा सामना मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघात पार पडला. वानखेडे स्टेडिअमवर खेळण्यात आलेला हा सामना मुंबईने 5 विकेट्सने जिंकला. या सामन्यात भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने मुंबईकडून आयपीएल पदार्पण केले. 23 वर्षीय अर्जुनने या सामन्यात गोलंदाजीतून चांगली कामगिरी केली. विजयानंतर जेव्हा संघ हॉटेलमध्ये पोहोचला, तेव्हा अर्जुनसह इतर खेळाडूंनी जोरदार मजा-मस्ती केली. त्यांचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने कोलकाताविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्याने 2 षटके गोलंदाजी करताना 8.50च्या इकॉनॉमी रेटने 17 धावा खर्च केल्या. वानखेडेच्या या मैदानावर जिथे संघाचे इतर अनुभवी गोलंदाज महागडे ठरत होते, तिथे अर्जुनने विरोधी संघाच्या फलंदाजांवर दबाव आणण्याचे काम केले.
सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या खेळाडूंनी हॉटेलमध्ये चांगलीच मजा केली. यादरम्यानचा व्हिडिओ स्वत: मुंबईच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओ पदार्पणवीर अर्जुनही डोल डोलतंय (Dol Doltay) या मराठी गाण्यावर जोरदार डान्स करताना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/CrGiVXeti7a/
अर्जुनसोबत ईशान किशन, टीम डेविड आणि डेवाल्ड ब्रेविस हे खेळाडूही ठुमके लावताना दिसत आहेत. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 27 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, 3 लाखांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. याव्यतिरिक्त 800हून अधिक कमेंट्सचाही पाऊस पडला आहे.
सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताने वेंकटेश अय्यर (104) याच्या वादळी शतकाच्या जोरावर 20 षटकात 6 विकेट्स गमावत 185 धावा केल्या. हे आव्हान मुंबईने 17.4 षटकातच 5 विकेट्स गमावत पूर्ण केले. तसेच, हंगामातील दुसऱ्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. विशेष म्हणजे, मंगळवारी (दि. 18 एप्रिल) खेळण्यात आलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने 14 धावांनी विजय मिळवला. (cricketer arjun tendulkar celebrated his debut in this style danced with his friends on marathi songs)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारासह अनेक खेळाडूंच्या 16 बॅट चोरीला, इतर महागड्या वस्तूही गायब
सामन्यापूर्वी वडील सचिनने दिलेल्या टिप्सचा अर्जुनकडून खुलासा, म्हणाला, ‘आम्ही रणनीती…’