बीसीसीआयने बुधवारी (दि. 06 जुलै) वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात वेगवान गोलंदाज आवेश खान यालाही संधी मिळाली आहे. मात्र, आता भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर येत आहे. आवेश खान दुखापतग्रस्त झाला आहे. आवेश दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धेत सेंट्रल झोनकडून खेळत आहे. तो वेस्ट झोनविरुद्ध खेळत असताना दुखापतग्रस्त झाला.
माध्यमांतील वृत्तांनुसार, आवेश खान (Avesh Khan) याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो सामन्याच्या दुसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नाही. आवेशच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. तो झेल पकडताना दुखापतग्रस्त झाला. त्याने या डावात 11 षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने 26 धावा खर्च केल्या. यावेळी त्याला एक विकेट घेण्यात यश आले. आवेशच्या दुखापतीविषयी सध्या अधिकृत माहिती समोर आली नाहीये.
आवेशचे आयपीएल 2023मधील प्रदर्शन
आवेश खान याने इंडियन प्रीमिअर लीग 2023 (Indian Premier League 2023) स्पर्धेत लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना 9 सामन्यात 8 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत शानदार प्रदर्शन केले आहे. त्याच्या नावावर 47 सामन्यात 55 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये 24 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याच्या सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी राहिली आहे.
भारतीय संघाकडून खेळलाय 20 सामने
दुसरीकडे, आवेशच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर तो भारताकडून एकूण 20 सामने खेळला आहे. त्याने भारताकडून टी20त 15 सामने खेळताना 13 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 18 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. तसेच, त्याने वनडेत 5 सामने खेळताना फक्त 3 विकेट्स घेतल्या आहेत. (cricketer avesh khan injured during during duleep trophy 2023 before india vs west indies t20 series)
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ
ईशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.
महत्वाच्या बातम्या-
करिअरच्या 100व्या कसोटीत स्मिथ फेल! ब्रॉडच्या घातक चेंडूवर ऑसी दिग्गज स्वस्तात बाद
Big Breaking: विश्वचषकासाठी नेदरलँड क्वालिफाय! निर्णायक सामन्यात स्कॉटलंडला चारली पराभवाची धूळ