दक्षिण आफ्रिकेचा स्टार डेविड मिलर याने सध्या क्रिकेटपासून विश्रांती घेतली आहे. आयपीएल 2023नंतर त्याने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. मात्र, तो सातत्याने जगभरातील टी20 लीगमध्ये भाग घेत आहे. अशातच त्याच्याविषयी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मिलर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. डेविड मिलरने गर्लफ्रेंडला प्रपोज केले आहे. जगातील विस्फोटक फलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या मिलरने स्वत:च सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
मिलरला मिळाला होकार
डेविड मिलर (David Miller) जगातील भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीपुढे गुडघे टेकण्यास भाग पाडतो. मात्र, तो आपली गर्लफ्रेंड कॅमिला हॅरिस (Camilla Harris) हिला प्रपोज करण्यासाठी स्वत: गुडघ्यांवर आला आहे. मिलरने गुडघ्यावर येत कॅमिलाला प्रपोज केले आणि किसदेखील केली. विशेष म्हणजे, आपल्या प्रेयसीकडून मिलरला उत्तरही मिळाले आहे. तिने मिलरला लग्नासाठी होकार दिला आहे.
मिलरची पोस्ट
मिलरने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत मिलरने कॅप्शनमध्ये लिहिले, “तिने हो म्हटलं. कॅमिला मिलर, ही एक चांगली अंगठी आहे ना?”
https://www.instagram.com/p/CwmRFb9I7I-/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
अभिनंदनाचा वर्षाव
आता चाहतेच नाही, तर जगभरातील क्रिकेटपटूही मिलरच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्यांचे अभिनंदन करत आहेत. भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या याने हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. तसेच, शुबमन गिल याने हार्ट इमोजींसह “वोहो” असे लिहित आनंद व्यक्त केला. तसेच राहुल तेवतिया आणि डेवॉन कॉनवे यांनीही कमेंट करत “तुमचे अभिनंदन” असे लिहिले आहे.
झिम्बाब्वेमध्ये केले प्रपोज
खरं तर, डेविड मिलर आणि कॅमिला हॅरिस (David Miller And Camilla Harris) यांचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. मिलरने कॅमिलाला जिथे प्रपोज केले आहे, ती जागा झिम्बाब्वे येथील मपाला जेना आहे. ही जागा झिम्बाब्वेच्या झम्बेजी नदीच्या पांढऱ्या मातीच्या किनाऱ्यांवर आणि झम्बेजी राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे.
कोण आहे कॅमिला हॅरिस?
डेविड मिलर याची होणारी पत्नी कॅमिला हॅरिस (David Miller’s future wife Camilla Harris) हिने तिच्या इंस्टाग्रामवर स्वत:विषयी लिहिले आहे. त्यानुसार, तीदेखील एक खेळाडू आहे. कॅमिला ही एक पोलो खेळाडू आहे. ती अनेकदा आयपीएलदरम्यान मिलरला चीअर करण्यासाठी भारतात आली होती. कॅमिला आणि मिलर दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अशात आता दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. मात्र, मिलरने लग्न कधी करणार, याविषयी सांगितले नाहीये. (cricketer david miller girlfriend accepts his marriage proposal cricketer kisses girl on beach know here)
हेही वाचाच-
सीपीएलमध्ये गप्टिलचा झंझावात! षटकारांची बरसात करत ठोकले शतक
कसे सुरू झाले ‘नागिन डान्सचे’ युद्ध, बांगलादेश आणि श्रीलंकेचा मजेदार किस्सा