---Advertisement---

शंभराव्या कसोटीपूर्वी वॉर्नरचा आपल्या बोर्डावर घणाघाती आरोप, काय काय म्हणाला वाचाच

On: शनिवार, डिसेंबर 24, 2022 8:41 PM
David-Warner
---Advertisement---

क्रिकेटमधून खळबळजनक बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर डेविड वॉर्नर याने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर गंभीर आरोप लावले आहेत. खरं तर, वॉर्नरने शनिवारी (दि. 24 डिसेंबर) क्रिकेट ऑस्ट्रेलियाला त्याच्या कर्णधारपदावरील बंदीच्या अपीलदरम्यान पाठिंबा न दिल्यामुळे चांगलेच झापले आहे. त्याने म्हटले आहे की, यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुरुवातीच्या कसोटीपूर्वी त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता.

डेविड वॉर्नर (David Warner) याच्यावर 2018मध्ये चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी त्याच्या कर्णधारपदावर कायमची बंदी घातली होती. 36 वर्षीय डेविड वॉर्नरने 2022च्या सुरुवातीला बंदीविरुद्ध अपील केली होती. वॉर्नर आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांची अशी इच्छा होती की, या प्रकरणावर चार भिंतींच्या आत चर्चा व्हावी.

मात्र, बोर्डाने नियुक्त केलेल्या स्वतंत्र आयुक्तांनी ही चर्चा सार्वजनिकरीत्या करण्यावर जोर दिला. यानंतर वॉर्नरला या महिन्याच्या सुरुवातीला आपली अपील मागे घेण्यासाठी प्रवृत्त व्हावे लागले. डावखुऱ्या हाताचा सलामीवीर वॉर्नर याने त्याच्या 100व्या कसोटीपूर्वी म्हटले की, “पर्थ कसोटीपूर्वी माझे मानसिक आरोग्य 100 टक्के नव्हते. त्यावेळी हे आव्हानात्मक होते.”

पुढे बोलताना वॉर्नर म्हणाला की, “हे व्यवस्थित करणे माझ्या हातात असते, तर मी गोष्टी ठीक केल्या असत्या. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मला कोणताच पाठिंबा मिळाला नाही.” वॉर्नर मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहे. तसेच, त्याने दक्षिण आफ्रिकेच्या पर्थ कसोटीत शून्य आणि तीन धावांच्या खेळीनंतर त्याला टीकेचा सामना करावा लागला. त्याने जानेवारी 2020नंतर कसोटीत एकही शतक ठोकले नाहीये.

वॉर्नर म्हणाला की, या प्रक्रियेत एवढा वेळ का लागला याबद्दल त्याला काहीच कळत नाहीये. त्याने असेही म्हटले की, “मी या मुद्द्याबद्दल फेब्रुवारीमध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधला होता. त्यामुळे मला माहिती नाहीये की, हे इतके का ताणले गेले. याचे उत्तर फक्त क्रिकेट ऑस्ट्रेलियाच देऊ शकतो.”

वॉर्नरचे वनडे शतक
कसोटीत जरी वॉर्नरची बॅट शांत असली, तरीही त्याने 22 नोव्हेंबर, 2022 रोजी वनडेत शानदार शतक झळकावले. त्याने इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करताना 102 चेंडूत 106 धावांची शतकी खेळी केली होती. त्याने या धावा करताना 2 षटकार आणि 8 चौकारही मारले होते. विशेष म्हणजे, त्याने हे शतक 1043 दिवसांनंतर झळकावले होते. (cricketer david warner made serious allegation on cricket australia regarding ban on captaincy read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्या बात है! वर्गमैत्रिणीच्या प्रेमात पडत तिलाच बनवली नवरी, पाकिस्तानी गोलंदाजाच्या लग्नाचे फोटो व्हायरल
मित्र कोट्याधीश बनताच ख्रिस गेलने मागितली जुनी उधारी; पूरनला म्हणाला, ‘आता तरी…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---