जगातील दिग्गज फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याची गणना होते. वॉर्नरवर चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी 2018मध्ये कर्णधार बनण्यावर कायमची बंदी घातली गेली होती. या गोष्टीला आता 4 वर्षे उलटले आहेत. अशात वॉर्नरे क्रिकेट ऑस्ट्रेलियावर जोरदार हल्लाबोल केला आहे. नेतृत्वावरील बंदीबद्दल त्याने मौन तोडत म्हटले आहे की, “मी गुन्हेगार नाहीये.”
वॉर्नरने तोडले मौन
डेविड वॉर्नर (David Warner) याने एका कार्यक्रमात म्हटले की, “मी गुन्हेगार नाहीये. तुम्हाला कोणत्यातरी स्तरावर अपील करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. मला माहितीये की, त्यांनी बंदी घातली आहे, पण कोणावरही कायमची बंदी घालणे जरा कठीण आहे.” खरं तर, डेविड वॉर्नर (David Warner) याच्या नेतृत्वावर 2018मध्ये आजीवन बंदी घातली होती. त्यावेळी तो चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी दोषी आढळला होता.
वॉर्नर पुढे बोलताना म्हणाला की, “हे निराशाजनक आहे. आधीच यावर विचार केला गेला पाहिजे. मला वाटते की, हे यावर्षी फेब्रुवारीमध्ये आणले गेले होते. हे माझ्यासोबतच माझे कुटुंबीय आणि यामध्ये सामील असणाऱ्या सर्व लोकांसाठी वेदनादायक आहे. आम्हाला त्या गोष्टींमध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. जे काही झाले, ते पुन्हा जगण्याची गरज नाहीये.”
यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच होता. मात्र, त्याने वनडे क्रिकेटला रामराम ठोकला होता. त्यावेळी वॉर्नरचीही खूप चर्चा रंगली होती, पण या बंदीमुळे पॅट कमिन्सकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र, आता असे दिसते की, कामाचा अतिरिक्त तणाव कमी करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया यावर काम करत आहे.
वॉर्नर बनणार ऑस्ट्रेलियाचा कर्णधार?
वॉर्नर आता त्याच्यावर चार वर्षांपूर्वी लादण्यात आलेल्या बंदीच्या पुनरावलोकनासाठी औपचारिकपणे अर्ज करू शकतो. जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी हटवली, तर वॉर्नरकडे 2023 आणि 2024मध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार बनण्याची संधी असेल. (cricketer david warner slams cricket australia for leadership role as he said he is not a criminal)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या मैदानात वादळी खेळी करणारा सूर्यकुमार अभ्यासात हिरो की झिरो? घ्या जाणून
स्वत:साठी नाही, तर संघासाठी! धावा कुटण्याच्या नादात विक्रम मोडलाय हेच विसरून गेलेला जगदीशन, म्हणाला…