संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात शुक्रवारी (०६ नोव्हेंबर) ३८ वा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात पार पडला. या सामन्यापूर्वीच वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोने आपल्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केली होती. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा डाव संपल्यानंतर ब्रावोला संघाने यथोचित मानसन्मान दिला. दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
ब्रावोने स्वीकारली निवृत्ती
वेस्ट इंडिज संघासाठी १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर ड्वेन ब्रावोने (०६ नोव्हेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळण्यापूर्वी आपण निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती. आपल्या अखेरच्या सामन्यात तो मैदानावर फलंदाजीला आला असताना वेस्ट इंडिज संघाने त्याला ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.
त्याने आपल्या अखेरच्या सामन्यात १२ चेंडूंमध्ये १० धावांची शानदार खेळी केली. या धावा करताना त्याने १ षटकार ठोकला. त्यानंतर तो बाद होऊन तंबूत परतत असताना त्याच्या सहकाऱ्यांनी देखील त्याला टाळ्या वाजवत ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.
Wish you a happy Retirement @DJBravo47 , the legend of T20 . Forever Champion 🐐 .
Best of luck for the next innings of your life . #Bravo pic.twitter.com/EGold5BohF— 𝐒𝐨𝐮𝐫𝐚𝐯𝐌 𝐒 𝐃™🦁 (@SouravMsd) November 6, 2021
अप्रतिम राहिली कारकीर्द
ब्रावोने वेस्ट इंडिजसाठी तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. यादरम्यान त्याने ४० कसोटी, १६४ वनडे व ९१ टी२० सामने खेळले. यामध्ये त्याने अनुक्रमे २२००, २९६८ व १२५५ धावा केल्या. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ शतके व २७ अर्धशतके जमा आहेत. यासोबतच त्याने गोलंदाजी करताना कसोटीत ८६, वनडेत १९९ आणि टी२०त ७८ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुजीबसाठी भारतीयांनी देव ठेवले पाण्यात; ट्विटरवर होतोय ट्रेंड
-भारताचा ‘हा’ खेळाडू म्हणतोय, “विराट बुर्ज खलिफा, तर धोनी बुर्ज अल अरब”
-‘बुमराह असावा भारताचा पुढील कर्णधार’; ‘हे’ कारण देत दिग्गजाने वाढवली यादी