सेहवागने पाया घातलेल्या ‘या’ विक्रमात न्यूझीलंडचा फलंदाजही सामील, इंग्लंडच्या गोलंदाजाला चोप चोप चोपलं

न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात 4 आंतरराष्ट्रीय टी20 आणि 4 वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. उभय संघातील टी20 मालिकेला 30 ऑगस्टपासून सुरुवात झाली. या पहिल्याच सामन्यात पाहुण्या न्यूझीलंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, संघाचा धाकड फलंदाज फिन ऍलन याने शानदार फलंदाजी करत टी20 क्रिकेटच्या एका खास क्लबमध्ये आपली जागा बनवली आहे.
पहिल्याच षटकात झळकावले 3 षटकार
झाले असे की, इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाकडून सलामीवीर फिन ऍलन (Finn Allen) याने पहिलेच षटक टाकत असलेल्या ल्यूक वूड (Luke Wood) याच्या 3 चेंडूंवर सलग 3 षटकार मारले. त्याने तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर हा पराक्रम गाजवला. हे तीन षटकार मारताच त्याने खास पराक्रम गाजवला. फिनने या सामन्यात 15 चेंडूंचा सामना करत एकूण 21 धावा केल्या. अशाप्रकारे तो टी20 सामन्यातील पहिल्याच षटकात तीन षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. त्याच्यापूर्वी या क्लबमध्ये वीरेंद्र सेहवाग, डेविड वॉर्नर यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
. . 6 6 6 .
Finn Allen starts with a bang at Chester-le-Street 🔥 #ENGvNZ #CricketNation pic.twitter.com/WuRAlx6XKP
— BLACKCAPS (@BLACKCAPS) August 30, 2023
सेहवागने केली होती सुरुवात
आतापर्यंत हा कारनामा फक्त चार फलंदाजांनीच केला आहे. मात्र, या विस्फोटक फलंदाजीची सुरुवात वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) याने केली होती. त्याने 2009मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर शानदार फलंदाजी केली होती. त्याने टी20 मालिकेतील पहिल्याच षटकातील तीन चेंडूवर तीन षटकार मारले होते. त्यानंतर 2010मध्ये डेविड वॉर्नर याने वेस्ट इंडिजविरुद्ध आणि एविन लुईस याने 2021मध्ये श्रीलंकेविरुद्ध हा पराक्रम केला होता. आता यामध्ये फिन ऍलेन याचा नव्याने समावेश झाला.
या फलंदाजांनी मारलेत पहिल्या षटकात तीन षटकार
वीरेंद्र सेहवाग, विरुद्ध- न्यूझीलंड (2009)
डेविड वॉर्नर, विरुद्ध- वेस्ट इंडिज (2010)
एविन लुईस, विरुद्ध- श्रीलंका (2021)
फिन ऍलन, विरुद्ध- इंग्लंड (2023)*
इंग्लंडचा विजय
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (England vs New Zealand) संघातील पहिल्या टी20 सामन्यात न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 139 धावा केल्या होत्या. हे आव्हान इंग्लंडने अवघ्या 14 षटकात 3 विकेट्स गमावत 143 करून पूर्ण केले. तसेच, सामना 7 विकेट्सने सहज जिंकला आणि मालिकेत 1-0ने आघाडी घेतली. (cricketer finn allen hit three sixes in first over of t20 match joins virender sehwag david warner club)
हेही वाचाच-
खूपच जास्त नाराज आहे संजू सॅमसन! यष्टीरक्षक फलंदाजांचा ‘तो’ फोटो व्हायरल, कारणही घ्या जाणून
IND vs PAK महामुकाबल्यापूर्वी माजी खेळाडूचा बाबरला मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘भारताविरुद्ध हारलो तरीही…’