Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाकिस्तानी खेळाडूचे न शोभणारे कृत्य! आधी सीमारेषेवर आपटली बॅट, नंतर मैदानाबाहेरच्या खुर्चीवरही काढला राग

पाकिस्तानी खेळाडूचे न शोभणारे कृत्य! आधी सीमारेषेवर आपटली बॅट, नंतर मैदानाबाहेरच्या खुर्चीवरही काढला राग

December 30, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
Imam-Ul-Haq

Photo Courtesy: Twitter/umarslogy


न्यूझीलंड संघ सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात त्यांना 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना 26 ते 30 डिसेंबरदरम्यान पार पडला. हा सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हक याने दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. एका बाजूने फलंदाज तंबूत जात होते, पण दुसरीकडे इमाम भिंतीप्रमाणे उभा होता. मात्र, तो त्याच्या शतकापासून 4 धावांनी हुकला आणि बाद झाला. त्यानंतर त्याने राग व्यक्त केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

इमाम उल हकने खुर्चीवर काढला राग
पाकिस्तान क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज इमाम उल हक (Imam Ul Haq) कराचीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 96 धावांवर बाद झाला. यावेळी त्याने 206 चेंडूंचा सामना केला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 10 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकारही निघाला.

मात्र, इमामने न्यूझीलंडकडून 72वे षटक टाकण्यासाठी आलेल्या ईश सोधीच्या दुसऱ्या गुगली चेंडूवर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याला चेंडू समजला नाही आणि तो यष्टीचीत झाला. यानंतर तो बाद झाल्यानंतर खूपच रागात असल्याचे दिसला. मैदानाबाहेर जाताना आधी त्याने त्याची बॅट सीमारेषेवर आपटली. मात्र, एवढ्यानेही त्याचे समाधान झाले नाही. त्याने मैदानाबाहेर ठेवलेल्या खुर्चीवर आपली बॅट मारली. यादरम्यानचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

Le imam to cameraman: abey bsdk😂😅 pic.twitter.com/i56EcvKxdf

— Umar Khalil (@umarslogy) December 30, 2022

पहिला कसोटी अनिर्णित
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळला गेलेला पहिला कसोटा सामना अनिर्णित ठरला. पाकिस्तानने शेवटच्या दिवशी दुसऱ्या डावात 8 विकेट्सच्या नुकसानीवर 311 धावांवर आपला डाव घोषित केला होता. यानंतर त्यांनी न्यूझीलंडपुढे 138 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान पार करण्यासाठी त्यांच्याकडे 15 ते 20 षटके शिल्लक होती. अशात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी वादळी अंदाजात डावाची सुरुवात केली. त्यांनी 7.3 षटकात 1 विकेटच्या मोबदल्यात 61 धावा केल्या होत्या. मात्र, खराब सूर्यप्रकाशामुळे सामना लवकर संपवावा लागला. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. (cricketer imam ul haq lost his temper after being dismissed see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याच्यात नेतृत्वाच्या सर्व खुबी’, श्रीलंकेचा दिग्गज बनला हार्दिकचा फॅन
विराट ते सेहवाग, ‘हे’ दिग्गज अपघातग्रस्त पंतसाठी चिंतेत; मोदीही म्हणाले, ‘या घटनेने मी…’


Next Post
Photo Courtesy: Twitter

क्रिकेटजगताला आदरार्थी असलेल्या 'या' चौघांनी सरत्या वर्षात सोडले जग

Bengaluru FC vs East Bengal

ईस्ट बंगालचा बंगळूरुवर निसटता विजय, प्ले-ऑफच्या आशा कायम

फिफा, टी20 विश्वचषकासह 'या' तीन वर्ल्डकप स्पर्धांनीही गाजवले 2022 वर्ष

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143