---Advertisement---

चार सामन्यात 4 वेगवेगळ्या सलामी जोड्या, भारतीय संघातील प्रयोगाला पूर्णविराम लागणार तरी कधी?

On: शनिवार, डिसेंबर 10, 2022 5:33 PM
Shikhar-Dhawan-And-Shubman-Gill
---Advertisement---

भारतीय संघात मागील वर्षभरापासून प्रयोग केले जात आहेत. यावरून संघव्यवस्थापनावर टीकेची झोड उठताना दिसत आहे. भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दोन सामने गमावले आहेत. अशात तिसरा सामना शनिवारी (दि. 10 डिसेंबर) चट्टोग्राम येथे खेळला गेला. या सामन्यात भारताकडून ईशान किशन आणि शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली. तिसऱ्या सामन्यात कर्णधार आणि सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकला नाही. त्याच्या जागी केएल राहुल नेतृत्व करत आहे.

भारतीय संघाने मागील काही काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेक सलामी फलंदाजांना आजमावले आहे. मात्र, शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांची जोडी कर्णधार रोहितच्या दुखापतीमुळे डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरली होती. मात्र, हे जाणून आश्चर्य वाटेल की, मागील चार वनडे सामन्यात चार सलामीवीर जोड्या आजमावल्या गेल्या आहेत.

चार सामन्यात चार वेगवेगळ्या जोड्या
खरं तर, या सामन्यासह मागील चार सामन्यात भारतासाठी चार वेगळ्या सलामी जोड्यांनी डावाची सुरुवात केली आहे. बांगलादेश दौऱ्यापूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळली होती. त्यादरम्यान भारतीय संघाच्या अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यावेळी शिखर धवन आणि शुबमन गिल यांनी भारतासाठी डावाची सुरुवात केली होती. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली होती. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे डावाची सुरुवात शिखर धवन आणि विराट कोहली यांनी डावाची सुरुवात केली. आता तिसऱ्या सामन्यातही शिखर धवन आणि ईशान किशन यांनी डावाची सुरुवात केली. अशाप्रकारे भारतीय संघाने मागील 4 सामन्यात चार जोड्या आजमावल्या आहेत.

https://twitter.com/BCCI/status/1601499878391447559

ईशान किशनने ठोकली दावेदारी
मालिकेच्या शेवटच्या सामन्यात भारतीय संघासाठी ईशान किशन याने सलामीला फलंदाजी केली. त्याने पहिल्याच सामन्यात आपली दावेदारी ठोकली. एकीकडे भारतीय सलामीवीर अपयशी ठरत आहेत, तिथे किशनने शानदार द्विशतक झळकावले आहे. या सामन्यातील त्याच्या खेळीमुळे शिखर धवन याच्या चिंता वाढवल्या आहेत. मागील काही काळापासून शिखर धवनही फॉर्मात नाहीये. आता आगामी काळात रोहितच्या पुनरागमनानंतर धवनला संघाबाहेर काढून किशनला संधी दिली जाऊ शकते. (cricketer ishan kishan open for team india 3rd odi in last four match india tried four new opening pair 2022)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आहा कडकच ना! ईशान किशनच्या द्विशतकावर गर्लफ्रेंडही फिदा, पोस्ट वेधतेय सर्वांचे लक्ष
चट्टोग्राममध्ये ईशानचे ‘विराट’ वादळ! बांगलादेशसमोर विजयासाठी‌ 410 धावांचे आव्हान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---