ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आशिया चषक 2023 स्पर्धेचे आयोजन होणार आहे. ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र, भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंका येथे खेळले जाणार आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामनाही श्रीलंकेत खेळले जातील. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ पाकिस्तानचा प्रवास करणार नसल्याची आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी बुधवारी (दि. 12 जुलै) पुष्टी केली.
महत्त्वाची बैठक
अरुण धुमाळ (Arun Dhumal) हे आयसीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन (Durban) येथे आहेत. यादरम्यान त्यांनी पुष्टी केली की, बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) आणि पीसीबी प्रमुख जका अश्रफ (Zaka Ashraf) यांनी गुरुवारी होणाऱ्या आयसीसी बोर्ड बैठकीपूर्वी स्पर्धेला अंतिम रूप देण्यासाठी भेट घेतली.
आशिया चषकाचे वेळापत्रक
धुमाळ यांनी डर्बन येथे माध्यमांशी बोलताना म्हटले की, “आमचे सचिव जय शाह यांनी पीसीबी प्रमुख जका अश्रफ यांची भेट घेतली. तसेच, आशिया चषकाच्या वेळापत्रकाला अंतिम रूपही दिले. आधी केलेल्या चर्चेच्या आधारावर पाकिस्तानमध्ये साखळी सामन्याचे चार सामने होतील. त्यानंतर श्रीलंकेत 9 सामने होतील. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान दोन्ही देशांचा समावेश असेल. तसेच, दोन्ही संघ अंतिम सामन्यात पोहोचले, तर अंतिम सामनाही श्रीलंकेत होईल.”
पाकिस्तानचा दौरा करणार नाही भारतीय संघ
आयपीएल अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी पाकिस्तानी माध्यमांतून आलेल्या भारत पाकिस्तान दौरा करणाऱ्या वृत्तांचे खंडन केले. तसेच, जय शाह हेदेखील पाकिस्तान दौऱ्यावर बैठकीसाठी आता आणि नंतरही जाणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. धुमाळ यांनी म्हटले की, “अशी कोणतीही चर्चा झाली नाही. भारतीय संघ आणि आमचे सचिव दोघेही पाकिस्तानचा दौरा करणार नाहीत. फक्त आशिया चषकाचे वेळापत्रक निश्चित केले गेले आहे.”
भारतीय संघ 2010प्रमाणे श्रीलंकेच्या दाम्बुला येथे पाकिस्तानविरुद्ध भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानला मायदेशात फक्त एक सामना नेपाळविरुद्ध खेळायचा आहे. इतर तिन्ही सामने अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश, बांगलादेश विरुद्ध श्रीलंका आणि श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामने आहेत. (cricketer jay shah and zaka ashraf finalised asia cup schedule india not going to pakistan)
महत्वाच्या बातम्या-
WI vs IND : काय होता डॉमिनिकामध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्याचा निकाल? धोनी ठरलेला टीकेचा धनी
निर्णायक चौथ्या कसोटीच्या आठवडाभरापूर्वीच इंग्लंडचा संघ जाहीर, खराब फॉर्मातील खेळाडूवर दाखवला विश्वास