शुक्रवारी (दि. 02 जून) इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट याने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स इंग्लंड विरुद्ध आयर्लंड संघात एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रूटने 56 धावांची शानदार खेळी साकारली. या खेळीसोबतच रूटने कसोटीत ऐतिहासिक कामगिरी केली. जो रूटने कसोटीत 11000 धावा पूर्ण केल्या. यासोबतच त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंदही झाली.
सर्वात वेगवान 11 हजार धावा करणारा तिसरा फलंदाज
जो रूट (Joe Root) याने कारकीर्दीतील 130 वा कसोटी सामना खेळताना 11000 धावांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे, त्याने सर्वात कमी सामन्यात 11000 धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा आणि इंग्लंडचा पहिलाच फलंदाज बनला. सर्वात कमी सामन्यात 11000 धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लारा याच्या नावावर आहे. त्याने 121 सामन्यात ही कामगिरी करून दाखवली होती. तसेच, श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज कुमार संगकारा याने 122व्या सामन्यात हा मैलाचा दगड पार केला होता. रूटने चहाच्या ब्रेकपूर्वी 52 धावा करून ही कामगिरी केली.
11,000 Test runs ✅
A magnificent achievement for Joe Root ????#ENGvIRE | ????: https://t.co/x2U3qVAiwW pic.twitter.com/Pce2O9xZRa
— ICC (@ICC) June 2, 2023
एकूण 11वा फलंदाज बनला रूट
जो रूट हा कसोटीत सर्वाधिक धावा करणारा जगातील 11वा खेळाडू बनला आहे. त्याच्या नावावर 130 सामन्यातील 238 डावात 11004 धावा झाल्या आहेत. रूटने आतापर्यंत 29 शतके आणि 58 अर्धशतकेही ठोकली आहेत. कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आहे. त्याने 200 सामन्यात 329 डावांमध्ये 15921 धावा केल्या होत्या. रूट आता ऑस्ट्रेलियन दिग्गज ऍलन बॉर्डर यांच्या विक्रमापासून थोडाच दूर आहे. त्यांच्या नावावर कसोटीत 11174 धावा आहेत.
रूट आहे फॅब फोर खेळाडू
विशेष म्हणजे, जो रूट हा 11000 धावा करणारा फॅब फोरमधील पहिला खेळाडू बनला आहे. विराट कोहली (8416), स्टीव्ह स्मिथ (8792), जो रूट आणि केन विलियम्सन (8124) या चौघांच्या गटाला फॅब फोर म्हटले जाते. त्यांंची निवड मागील एक दशकातील सर्वोत्तम प्रदर्शनाच्या आधारावर करण्यात आली आहे. (cricketer joe root became third fastest batsman to completes 11000 test runs in terms of matches eng vs ire )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! महिला आशिया चषकासाठी भारतीय ‘अ’ संघाची घोषणा, विश्वचषक गाजवणाऱ्या रणरागिनीकडे नेतृत्व
वेस्ट इंडीज क्रिकेटची नवी शोधमोहीम! माजी दिग्गजाने सांभाळलेल्या महत्वाच्या पदाचा कार्यकाळ संपला