इंग्लंड संघ सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने 267 धावांनी जिंकला आहे. उभय संघांतील दुसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारी (24 डिसेंबर) वेलिंगटनमध्ये सुरू झाला. पहिल्या दिवशी न्यूझीलंडला सुरुवात चांगली मिळाली. पण जो रुट आणि हॅरी ब्रुक यांनी दिवसाचा शेवट इंग्लंडसाठी चांगला केला. जो रूट याने स्वतःचे शतक पूर्ण केले आणि नावावर एक खास विक्रम देखील केला.
जो रूट (Joe Root ) इंग्लंड क्रिकेट संघाच्या इतिहासातील एक महान फलंदाज आहे. त्याने इंग्लंडसाठी आतापर्यंत 128 कसोटी सामने खेळले असून शुक्रवारी 29 वा कोसटी सामना खेळण्यासाठी तो मैदानात उतरला. कारकिर्दीतील या 29 व्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात जो रूटने शतक ठोकले. पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. इंग्लंडने पहिल्या तीन विकेट्स संघाची धावसंख्या अवघी 21 असताना गमावल्या होत्या. पण चौथ्या विकेटसाठी जो रुट आणि हॅरी ब्रुक () यांनी 294 धावांची नाबाद भागीदारी केली. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी रुटने 101* तर ब्रुकने 184* धावा केल्या असून दोघेही खेळपट्टीवर कायम आहेत.
जो रुट इंग्लंडचा सर्वोत्तम कसोटी फलंदाजांपैकी एक असला, तरी मागच्या आठ महिन्यांमध्ये त्याने शुक्रवारी पहिले शतक केले. या शतकासह त्याने ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांचा बरोबरी केली आहे. रुटने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक केल्यानंतर त्याचा कसोटी शतकांची एकूण संख्या 29 झाली. दिग्गज ब्रॅडमन यांच्या नावापुढेही एकूण 29 कसोटी शतकांची नोंद आहे. डिसेंबर 2012 मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या रुटने आतापर्यंत 10,801 कसोटी धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याचे 29 शतकांसह 56 अर्धशतके केली आहेत आणि सरासरी 49.77 राहिली आहे.
दरम्यान, वेलिंगटनमध्ये सुरू असलेल्या या कसोटी सामन्याच जो रूटचे महत्वपूर्ण शतक संघाच्या अगदी गरजेच्या वेळी आले. इंग्लंडची वरची फळी स्वस्तात बाद झाल्यानंतर रुट आणि ब्रुकने इंग्लंडचा डाव संभांळला. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी इंग्लंडने 3 बाद 315 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू करण्यासाठी रुट आणि ब्रुक जोडी पुन्हा मैदानात येईल. (Joe Root equaled Don Bradman’s record after scoring a century in the second Test against New Zealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शाळेतील पोरीची चूक’, म्हणणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गजाला हरमनप्रीतचे सडेतोड प्रत्युत्तर; काय म्हणाली वाचाच
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके मारणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये रूट ‘या’ स्थानी, विराट टॉपला कायम