पुणे (17 मार्च 2024)- के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आजची तिसरी लढत पालघर विरुद्ध नाशिक यांच्यात झाली. दोन्ही संघाना दुसऱ्या क्रमांकावर येण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होते. पालघरच्या यश निंबाळकर व प्रतिक जाधव यांनी आपल्या पहिल्या चढाईत गुण मिळवत पालघर संघाला आघाडी मिळवून दिली. तर पालघरच्या अभिनय सिंग ने गणेश गीतेची पकड केली. पालघर संघाने चौथ्या मिनिटाला नाशिक संघाला ऑल आऊट करत 9-0 अशी आघाडी मिळवली.
पवन भोर ने सामन्याच्या सहाव्या मिनिटाला 2 गुण मिळवत नाशिक संघाचा गुणांचा खात उघडला. त्यानंतर ईश्वर पाथाडे ने सुपर रेड करत संघांची पिछाडी कमी केली. दोन्ही संघाच्या चढाईपटूंनी गुण मिळवत सामन्यात चुरस आणली. मध्यंतरा पूर्वीं नाशिक संघाने पालघर संघाला 2 वेळा ऑल आऊट करत सामन्याला कलाटणी दिली. पवन भोर ने उत्कृष्ट चढाया करत नाशिक संघाला सामन्यात आणले. मध्यंतरापूर्वी नाशिक संघाने 23-22 अशी आघाडी घेतली.
नाशिकच्या पवन भोर ने सुपर टेन पूर्ण करत पालघर संघाला पुन्हा एकदा ऑल आऊट करत सामन्यात निर्यायक आघाडी मिळवली. पालघरच्या प्रतिक जाधव ने सुद्धा सुपर टेन पूर्ण करत सामन्यात चुरस वाढवली. 35-31 अशी आघाडी नाशिक कडे असताना पालघरच्या प्रतिक जाधव ने सुपर रेड करत नाशिक संघाला ऑल आऊट केले आणि सामना बरोबरीत आणला. शेवटची दोन मिनिट शिल्लक असताना सामना 39-39 असा बरोबरीत होता. उर्वरित वेळ दोन्ही संघांनी कोणताही धोका न पत्करता सामना 41-41 असा बरोबरीत सोडवला.
बेस्ट रेडर- प्रतिक जाधव, पालघर
बेस्ट डिफेंडर- गणेश गीते, नाशिक
कबड्डी का कमाल- पवन भोर, नाशिक
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी शेन वॉटसनचा नकार, समोर आले मोठे कारण
महिला प्रीमियर लीग जिंकणाऱ्या संघावर होणार कोट्यवधींचा वर्षाव! उपविजेत्या संघालाही मिळणार मोठी रक्कम