---Advertisement---

WPL 2024 : आरसीबीच्या विजयावर राजस्थान रॉयल्सची चुटकी, शेअर केलं भन्नाट मिम

---Advertisement---

महिलाप्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात स्मृती मंधानाच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवला आहे. आरसीबी फ्रेंचायसी गेली 16 वर्षे जेतेपदासाठी आतुरलेली होती. अखेर स्मृती मंधानाने वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं जेतेपद मिळवून आरसीबीच्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपवली आहे. मात्र आरसीबीच्या या विजयानंतर मीम्सचा वर्षाव होयला सुरवात झाली आहे. यावेळी चक्क राजस्थान रॉयल्स संघाने आरसीबी पुरुष संघाची खिल्ली उडवल्याचे पहायला मिळाले आहे.

याबरोबरच आयपीएलची सुरवात ही  2008 मध्ये झाली होती. तेव्हापासुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रँचायझीला एकदा पण ट्रॉफी जिंकता आली नव्हती. पण यावेळी महिला प्रीमियर लीग 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फ्रँचायझीचा ट्रॉफीचा दुष्काळ संपला आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली बंगळुरूने पहिल्यांदाच कोणती तरी ट्रॉफी जिंकली आहे. पण बंगळुरूच्या विजयानंतर राजस्थान रॉयल्सने त्यांच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे.

यामध्ये त्यांनी आरसीबीच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यासोबतच आरसीबी पुरुष संघाची खिल्ली उडवणारा फोटोही शेअर केला आहे. तर या पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तारक मेहता का उल्टा चष्माचे दोन पात्र दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे हा अंदाज लावण्यात आला आहे. तसेच राजस्थान रॉयल्सची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने रविवारी महिला प्रीमियर लीग (WPL) च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा आठ गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. तसेच बंगळुरूच्या पुरुष संघाने कधीही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही, परंतु महिला संघाने डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात विजय साकार केला आहे.

त्याआधी प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली संघाला शेफाली वर्मा आणि कर्णधार मेग लॅनिंग या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र आठवे षटक टाकण्यासाठी आलेला डावखुरा फिरकी गोलंदाज मोलिनक्सने या षटकात शेफाली, कॅप्सी आणि जेमिमाला बाद करून दिल्लीचे कंबरडे मोडून टाकले होते. तसेच अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी करत  27 चेंडूत 44 धावा केल्या होत्या. तर त्यामध्ये  2 चौकार आणि 3 षटकार समावेश होता.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---