महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) संघाने जिंकली आहे. तसेच रविवारी (17 मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्सला 8 विकेट्सने पराभूत केले आहे. यानंतर आरसीबीच्या विजयानंतर चाहत्यांच्या आनंदाला कोणतीच सीमा उरली नाही. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
याबरोबरच हा विजय आरसीबीच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्वांचा होता. कारण आयपीएलच्या इतिहासात आरसीबीने एकदाही विजेतेपद पटकावले नाही, परंतु डब्ल्यूपीएलच्या दुसऱ्या सत्रात आरसीबीने विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे या विजयाने सेलिब्रेशन आरसीबीच्या चाहत्यांनी जोरदार केले असून सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. तर या व्हायरल व्हिडिओ बेंगळुरूचा असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच या व्हिडिओमध्ये हजारो आरसीबीचे चाहते विजयाचा आनंद साजरा करत आहेत.
BENGALURU HAVE GONE NUTS AFTER THE TROPHY WIN. 🤯🏆pic.twitter.com/iC8QFL8rDY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 17, 2024
अशातच महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात प्रथमच, RCB ने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. तर याआधी हे दोन्ही संघ चार वेळा समोरा समोर आले होते. मात्र चारही वेळा दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा पराभव केला होता. तसेच मागील हंगाम आरसीबीसाठी खूपच खराब राहिला होता.तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ गेल्या मोसमातही फायनलमध्ये पोहोचला होता. पण तेथे देखील दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला होता.
RCB's winning moment 🏆
The emotions say it all ❤️
(via @wplt20) | #DCvRCB | #WPLFinal
— Secular Chad (@SachabhartiyaRW) March 17, 2024
दरम्यान, अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ 18.3 षटकात सर्वबाद 113 धावा करू शकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर अवघ्या 114 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सहज गाठलं. सोफी डिव्हाईन आणि स्मृती मंधाना या जोडीने सावध सुरुवात करून दिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून श्रेयंका पाटील, सोफी मोलिनेक्स आणि आशा सोभना यांनी कमाल केली. श्रेयंका पाटीलने 3.3 षटकात 12 धावा देत 4 गडी बाद केले. सोफी मोलिनेक्सने 4 षटकात 20 धावा देत 3 गडी बाद केले. तर आशा सोभनाने 3 षटकात 14 धावा देत 2 गडी बाद केले आहेत.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.
महत्वाच्या बातम्या –
- श्रेयंका पाटीलचा नादचं खुळा, जिंकली पर्पल कॅप, अन् फायनलमध्ये सर्वाधिक विकेट
- आरसीबीच्या विजयानंतर कर्णधार स्मृतीने विजयाचं श्रेय दिलं या खेळाडूंना, म्हणाली…