---Advertisement---

WPL Final मध्ये दिल्लीची दाणादाण, पहिल्या ट्रॉफीसाठी RCB समोर 114 धावांचे आव्हान

Shreyanka Patil
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स संघ रविवारी (17 डिसेंबर) पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळला. विमेंस प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स संघ आमने सामने आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण आरसीबीच्या फिरकी गोलंदाजीपुढे यजमान संघाच्या विकेट्स एकापाठोपाठ एक गेल्या. 18.3 षटकात आणि अवघ्या 113 धावांवर दिल्ली संघ सर्वबाद झाला.

दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली होती. पण शफाली वर्मा वैयक्तिक 44 धावा करून डावातील आठव्या षटकात बाद झाली. सोफी मोलिनक्स हिने याच षटकात एकूण तीन विकेट्स नावावर केल्या, जो सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला. शफालीने आठव्या षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट गमावल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर जेमिमाह रॉड्रिग्ज, तर चौथ्या चेंडूवर एलिस कॅप्सी बाद झाली. जेमिमाह आणि एलिस कॅप्सीने शुन्यावर विकेट्स गमावल्यानंतर दिल्लीच्या अडचणी वाढल्या.

फिरकीपटून सोफिने पहिल्या तीन विकेट्स मिळवून दिल्यानंतर पुढच्या सर्व विकेट्स देखील फिरकी गोलंदाजांनीच घेतल्या. श्रेयांका पाटील हिने 3.3 षटकात 12 धावा खर्च करून 4 विकेट्स नावावर केल्या. सोफि मोलिनक्सने 4 षकात 20 धावा देत 3 विकेट्स नावावर केल्या. तर आशा शोभना 3 षटकात 12 धावा खर्च केल्यानंतर दोन विकेट्स नावावर करू शकली.

दिल्लीसाठी एटकी शफाली वर्मा 44 धावा करून बाद झाली. त्याव्यतिरिक्त एकही फलंदाज संघासाठी महत्वपूर्ण धावा करू शकली नाही. कर्णधार मेग लॅनिंग हिने वैयक्तिक 23 धावांवर विकेट गमावली. मारिझान केप 8, जेस जोनासेन 12, मिन्नू मणी 5, अरुंधती रेड्डी 10, शिखा पांडे 5* धावांचे योगदान देऊ शखले. तानिया फाटिया हिने शुन्यावर विकेट गमावली.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एस मेघना, एलिस पेरी, दिशा कासट, रिचा घोष (यष्टीरक्षक), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, शोभना आशा, रेणुका सिंग.

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शिखा पांडे.
(RCB NEED 114 TO WIN THE WPL TITLE)

महत्वाच्या बातम्या – 
सोफी नाही आरसीबीची राणी म्हणा! एकाच षटकात बदलले चित्र, दिल्ली कॅपिटल्स अडचणीत
WPL Final । नाणेफेकीत मेल लेनिंगची बाजी, या प्लेइंग इलेव्हनसह दोन्ही संघ फायनलसाठी सज्ज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---