महिला प्रीमियर लीग स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह जेतेपदावर नाव कोरलं आहे. तसेच गेल्या हंगामात साखळी फेरीतच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आव्हान संपुष्टात आलं होतं. याआधी दिल्ली कॅपिटल्सने याच स्पर्धेत बंगळुरुला दोनदा पराभूत केलं होतं. मात्र अंतिम फेरीत स्मृती मंधानाने कमाल केली आणि संघाला विजय मिळवून दिला आहे. तसेच या अंतिम सामन्यानंतर कर्णधार स्मृतीने विजयाचे श्रेय या खेळाडूंना दिले आहे. त्या बद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
याबरोबरच अंतिम सामना जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची कर्णधार स्मृतीने सांगितले आहे की, “जिंकल्यानंतर भावना व्यक्त करताना माझं मन भरून आलं आहे. काय करू असं झालं आहे. मी एक गोष्ट सांगेन की मला टीमचा अभिमान आहे. आम्ही बंगळुरुत चांगली कामगिरी केली. आम्ही दिल्लीत आलो आणि आम्हाला दोनदा पराभव पत्करावा लागला. त्याबद्दल आम्ही बोललो होतो की आम्हाला योग्य वेळी पाऊल उचलण्याची गरज आहे. या स्पर्धा योग्य वेळी आम्ही कमबॅक केलं. गेल्या वर्षाने आम्हाला बरंच काही शिकवलं. काय चुकलं, काय बरोबर झालं.”
तसेच पुढे बोलताना ती म्हणाली आहे की, “व्यवस्थापनाने फक्त सांगितले की ही तुमची टीम आहे, तुमच्या पद्धतीने तयार करा. आरसीबीसाठी ते बरेच काही आहे. ट्रॉफी जिंकणारी मी एकटी नाही, संघाने ट्रॉफी जिंकली आहे.”
दोन्ही संघांची प्लेइंग 11
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, तानिया भाटिया (विकेटकीपर), शिखा पांडे, मिन्नू मणी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, सभिनेनी मेघना, एलिस पेरी, रिचा घोष (विकेटकीपर), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग.
महत्वाच्या बातम्या –