---Advertisement---

कप आला रे! RCB च्या पोरींनी करून दाखवलं, उचलली WPLची ट्रॉफी

---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रँचायझी रविवारी (17 मार्च) अखेर टी-20 लीगची चॅम्पियन बनली. पुरुष संघाला मागच्या 16 वर्षात न जमलेली कामगिरी स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील महिला आरसीबी संघाने केली. विमेंस प्रीमियर लीग 2024च्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आरसीबीने 8 विकेट्स राखून विजय मिळवला.

आरसीबीला या सामन्यात विजयासाठी 114 धावांचे लक्ष्य मिळाले होते. सलामीवीर स्मृती मंधाना हिने 31, तर सोफी डिव्हाइन हिने 32 धावांची खेळी केली. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या एलिस पेरी () हिने 35*, तर रिचा घोष हिने 17* धावांचे योगदान दिले. शेवटच्या चेंडूवर षटकार मारून रिचानेच सामन्याचा शेवट केला. दिल्ली कॅपिटल्सला मिळालेल्या दोन विकेट्स शिखा पांडे आणि मिन्नू मनी यांनी घेतल्या.

दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 64 धावांपर्यंत एकही विकेट गमावली नव्हती. पण संघाची धावसंख्या 113 असताना त्याच्या 10 विकेट्स गेल्या होत्या. म्हणजे दरम्याच्या 49 धावा करण्यासाठी दिल्लीच्या 10 खेळाडूंनी विकेट्स गमावल्या. सलामीवीर जोडी सोडली, तर एकही खेळाडू संघासाठी चांगली खेळी करू शकली नाही. शफाली वर्मा हिने दिल्लीसाठी सर्वाधिक 44, तर कर्णधार मेग लॅनिंग 23 धावा करून बाद झाल्या.

नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीला प्रतम गोलंदाजी करावी लागली. पण श्रेयांका पाटील, सोफी मोलिनक्स आणि आशा शोभना यांनी आपल्या फिरकी गोलंदाजीने कमाल केली. श्रेयांकाने 3.3 षटकात 12 धावा खर्च करत सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सोफीने 4 षटकात 20 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या. तर आशाने घेतलेल्या 2 विकेट्साठी तीने 3 षटकात 14 धावा खर्च केल्या.
(Royal Challengers Bangalore wins the WPL 2024 )

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: स्मृती मानधना (कर्णधार), सोफी डिव्हाईन, एस मेघना, एलिस पेरी, दिशा कासट, रिचा घोष (यष्टीरक्षक), सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, शोभना आशा, रेणुका सिंग.

दिल्ली कॅपिटल्स: मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शिखा पांडे.

महत्वाच्या बातम्या – 
WPL Final मध्ये दिल्लीची दाणादाण, पहिल्या ट्रॉफीसाठी RCB समोर 114 धावांचे आव्हान
सोफी नाही आरसीबीची राणी म्हणा! एकाच षटकात बदलले चित्र, दिल्ली कॅपिटल्स अडचणीत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---