स्मृती मंधाना हिच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ रविवारी (17 मार्च) डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. अंतिम सामन्यात आरसीबीपुढे दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान आहे. म्हणजेच यावेळी डब्ल्यूपीएलला नवीन चॅम्पियन मिळणार आहेत. आयपीएलमध्ये मागच्या 17 वर्षात आरसीबीचा पुरुष संघ एकही ट्रॉफी जिंकलू शकला नाही. पण स्मृती मंधानाच्या मते महिलांचा संघ विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज आहे.
अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरण्यापूर्वी स्मृती मंधानाची खास प्रतिक्रिया चर्चेत आहे. स्मृती मंधाना (Smriti Mandhana) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्याआधी आरसीबीच्या खेळाडूंवर दबाव टाकू इच्छित नाहीये. याच कारणास्तव आरसीबी पुरुष संघाची तुलना देखील तिला करायची नाहीये. आरसीबीने आयपीएलमच्या मागच्या 16 हंगामांमध्ये एकदाही अंतिम सामना जिंकला नाहीये. पण संघ तीन वेळा (2009, 2011, 2016) उपविजेता राहिला आहे.
यावर्षी डब्ल्यूपीएलचा दुसरा हंगाम खेळला गेला. स्मृतीच्या नेतृत्वातीर आरसीबी संघ पहिल्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. उपांत्य सामन्यात आरसीबीने मुंबईला 5 धावांनी पराभूत केले आणि अंतिम सामना गाटला. उपांत्य सामन्यातील विजयानंतर स्मृती म्हणाली की, “सर्वप्रथम मला असे वाटते की, चालू वर्ष आमच्यासाठी फ्रँचायझीसोबत एकरुप होण्यासाठी महत्वाचे राहिले. पुरुष संघासोबत जे झाले, त्यामुळे कधीकधी दबाव येतो. त्यामुळेच आम्ही असा विचार करतो की आम्ही फक्त दुसरा हंगाम खेळत आहोत. त्यामुळे जास्त चिंता करण्याची गरज नाही. पुरुष संघासोबत काय झालं, त्याच्याशी आम्हाला देणं-घेणं.”
महिला आरसीबीसाठी संघासाठी हा टी-20 लीगचा पहिलाच अंतिम सामना असणार आहे. याआधी मागच्या हंगामात आरसीबी संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी राहिला होता. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्ससाठी हा डब्ल्यूटीसीचा दुसरा अंतिम सामना असणार आहे. मागच्या हंगामात देखील मेग लेनिंग हिच्या नेतृत्वातील दिल्ली संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. पण मुंबई इंडियन्सकडून त्यांना पराभव मिळाल्यामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यावर्षी मुंबई अंतिम सामन्यात नसून दिल्ली आणि बेंगोलरपैकी एक संघ डब्ल्यूटीसीचा विजेता बनणार आहे. (RCB Women’s Team Captain Smriti Mandhan’s reaction when compared to RCB Men’s team)
महत्वाच्या बातम्या –
रोहित शर्माने T20वर्ल्डकपसाठी निवडकर्त्यांसमोर केली मागणी, म्हणाला,’मला विराट….
“घोट्यावर तीन इंजेक्शन्स घेतली, माझं सर्व काही दिलं, परंतु…”, हार्दिकनं व्यक्त केलं विश्वचषक खेळू न शकल्याचं दु:ख






