---Advertisement---

फॉर्ममध्ये परतताच कॅप्टन सूर्याने पडल्या ‘या’ व्यक्तिच्या पाया, तो गंभीर नसून टीम इंडियासाठी खास

On: रविवार, जानेवारी 25, 2026 1:25 PM
---Advertisement---

भारत टी२० विश्वचषक २०२६च्या आधी घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिका खेळत आहे. यातील भारताने पहिले दोन सामने जिंकत ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेआधीच भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या खराब फॉर्मबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. तो भारताचा टी२० कर्णधार म्हणून यशस्वी ठरला असला तरी त्याच्या फलंदाजीची लय हरवली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२०त त्याने नाबाद अर्धशतकी खेळी करत टीकाकरांना शांत केले आहे.

सूर्यकुमारने भारताच्या दुसऱ्या टी२०मध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सामनाविजयी खेळी केली. त्याने नाबाद ८२ धावा केल्या होत्या. संघाला सामना जिंकून दिल्यावर तो ड्रेसिंग रुमकडे जात असताना डगउटमध्ये बसलेल्या एका व्यक्तिच्या पाया पडला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

या व्हिडिओमध्ये सूर्यकुमारने ज्याच्या पाया पडल्या तो भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नसून सपोर्ट स्टाफमधील थ्रोडाऊन स्पेशालिस्ट राघवेंद्र (रघू) आहे, हे दिसले.

रघू हा मागील एका दशकापासून भारताच्या ड्रेसिंग रुमचा अविभाज्य भाग आहे. त्याने नेटमध्ये महत्वाच्या सामन्यांसाठी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली सारख्या अनेक भारतीय दिग्गजांना तयार केले आहे. सूर्यकुमारसोबतही त्यांनी नेटमध्ये कसून सराव केला. त्याचेच यश म्हणून भारताच्या कर्णधाराला फलंदाजीत लय सापडली आहे. रघू यांना भारताचे खेळाडू आणि प्रशिक्षक विभागाकडून विशेष सन्मान दिला जातो.

सूर्यकुमार २०२५मध्ये २१ टी२० सामन्यांत खेळताना केवळ २१८ धावा करू शकला होता. यामध्ये त्याने एकही अर्धशतक केले नाही. एकीकडे सघ मालिका जिंकत असताना कर्णधार धावा करण्यात अपयशी ठरतोय ते पण विश्वचषक पुढे येऊन ठेपला असता याचा संघावर चांगला परिणाम होणार नाही, अशी चिंता सतावत होती. आता फलंदाजीत त्याचा परतलेला फॉर्म पाहून भारतीय चाहत्यांना धीर आला असेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमारने संयमी खेळ केला. तो २२ चेंडूत ३२ धावाच करू शकला. दुसऱ्या सामन्यात मात्र त्याने इशान किशनच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत १२२ धावांची भागीदारी केली होती, जी भारताच्या विजयात महत्वाची ठरली. किशन ३२ चेंडूत ७६ धावा करत बाद झाला.

किशन बाद झाल्यावर सूर्यकुमारने शिमव दुबेसोबतही चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची (३७ चेंडू) भागीदारी केली. यामुळे भारताने २०९ धावसंख्येचे लक्ष्य १५.२ षटकात ३ विकेट्स गमावत पूर्ण केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---