आयपीएल 2024 स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे. या स्पर्धेतून विराट कोहली क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. गेल्या एक महिन्यापासून विराट कोहली क्रिकेट खेळलेला नाही. तसेच भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली टी20 विश्वचषकातून वगळला जाऊ शकतो, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. यामुळे रोहित शर्माने विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
याबरोबरच 17 जानेवारी 2024 नंतर विराट कोहली एकही सामना खेळलेला नाही. आता आयपीएलच्या माध्यमातून पुन्हा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी भारतात परतला आहे. तसेच त्याचा मुंबई विमानतळावर परतल्याचे व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अशातच कीर्ती आझादने कोहलीचा फोटो शेअर केल्यानंतर रोहित म्हणाला आहे की, मला कोणत्याही किंमतीत विराट कोहली संघात हवा आहे. रोहितच्या या वक्तव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. अशीच वेळ किंग कोहलीवर आली आहे जेव्हा त्याची चमकदार कामगिरी असूनही त्याला वर्ल्ड कपमधून वगळण्याची चर्चा आहे. मात्र रोहित उघडपणे कोहलीच्या समर्थनार्थ समोर आला आहे.
तसेच टी20 विश्वचषक संघ निवडीसाठी आयपीएलच्या कामगिरीचा विचार केला जाईल, असे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे विराट कोहलीला आयपीएलमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवावी लागेल. त्यानंतरच त्याच्या निवडीसाठी विचार केला जाईल, असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.
Why should Jay Shah, he is not a selector, to give responsibility to Ajit Agarkar to talk to the other selectors and convince them that Virat Kohli is not getting a place in the T20 team. For this, time was given till 15th March. If sources are to be believed, Ajit Agarkar was… pic.twitter.com/FyaJSClOLw
— Kirti Azad (@KirtiAzaad) March 17, 2024
दरम्यान, विराट कोहली हे नाव जागतिक क्रिकेटसाठी किती मोठे आहे हे सांगण्याची गरज नाही. कारण गेल्या T20 विश्वचषकातही कोहली संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तसेच 2022 च्या टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयात विराट कोहलीचे योगदान कोण विसरू शकणार नाही. असे असूनही, कोहलीला आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 मध्ये संघाचा भाग नसल्याच्या बातम्या येत होत्या. पण यावेळी रोहित शर्माने सगळ्याचे तोंड बंद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- “घोट्यावर तीन इंजेक्शन्स घेतली, माझं सर्व काही दिलं, परंतु…”, हार्दिकनं व्यक्त केलं विश्वचषक खेळू न शकल्याचं दु:ख
- T20 वर्ल्डकपमध्ये आता पाऊस अन् वादळानंतरही सामन्याचा निकाल लागणार! ICC आणणार हे 4 नियम