---Advertisement---

IPL 2024 मध्ये इलेक्ट्रिशियनचा मुलगा पाडणार मुंबईसाठी धावांचा पाऊस! लंबे-लंबे छक्के मारण्यात आहे पटाईत

Tilak-Varma
---Advertisement---

आयपीएल 2024 येत्या 22 मार्चपासून सुरू होत आहे. सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 मध्ये पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध 24 मार्च रोजी खेळायचा आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होईल. मुंबई इंडियन्सचा एक असा फलंदाज आहे जो आयपीएल 2024 मध्ये त्यांचा हुकुमी एक्का ठरू शकतो. हा फलंदाज दुसरा-तिसरा कोणी नसून तिलक वर्मा आहे.

तिलक वर्मा याचे वडील इलेक्ट्रिशियन होते. कठीण परिस्थितीचा सामना करत त्यानं प्रथम आयपीएलमध्ये नाव कमावले आणि त्यानंतर तो भारतीय संघाकडूनही खेळला. तिलक मैदानावर लंबे-लंबे छक्के मारण्यात पटाईत आहे. तो आयपीएल 2022 पासून मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. गेल्या दोन हंगामापासून तो मधल्या फळीतल मुंबई इंडियन्सचा सर्वात महत्त्वाचा फलंदाज आहे.

21 वर्षीय तिलक वर्मानं आयपीएलमध्ये आतापर्यंत 25 सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं 38.95 च्या सरासरीनं 740 धावा ठोकल्या आहेत. या डावखुऱ्या फलंदाजानं आयपीएलमध्ये 3 अर्धशतकंही झळकावली आहेत. तिलक वर्मानं भारतासाठी 4 एकदिवसीय आणि 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं टी-20 मध्ये 336 आणि एकदिवसीय सामन्यात 68 धावा केल्या आहेत. तिलक वर्मानं आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्ससाठी 14 सामने खेळले, ज्यात त्यानं 36.09 च्या सरासरीनं 397 धावा केल्या.

तिलक वर्माचे वडील व्यवसायानं इलेक्ट्रिशियन होते. त्यांची आर्थिक परिस्थिती फार हलाखीची होती. तिलकचे वडील आपल्या मुलाला क्रिकेट अकादमीमध्ये पाठवू शकत नव्हते. त्यानंतर प्रशिक्षक सलाम ब्याश यांनी त्याचा सर्व खर्च उचलला. त्यांच्या सहकार्यानं आज तो या शिखरावर पोहोचला आहे. तिलक वर्मा यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्याचे प्रशिक्षक सलाम ब्याश यांनी कोचिंग व्यतिरिक्त त्याला जेवण आणि गरज पडल्यास त्यांच्या घरी राहण्यासाठी जागा देखील दिली होती.

तिलक वर्माला मुंबई इंडियन्सनं आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात 1.7 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सारख्या संघांनी देखील त्याच्यावर बोली लावली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

“घोट्यावर तीन इंजेक्शन्स घेतली, माझं सर्व काही दिलं, परंतु…”, हार्दिकनं व्यक्त केलं विश्वचषक खेळू न शकल्याचं दु:ख

देशात निवडणुका असल्या तरीही IPL 2024 भारतातच होणार, जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा ‘मास्टर प्लॅन’

लक्ष्य सेनचं स्वप्न भंगलं, ‘ऑल इंग्लंड ओपन’ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---