---Advertisement---

देशात निवडणुका असल्या तरीही IPL 2024 भारतातच होणार, जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा ‘मास्टर प्लॅन’

---Advertisement---

येत्या 22 मार्चपासून आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होणार आहे. देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआयनं आतापर्यंत फक्त पहिल्या टप्प्यातील सामन्यांची घोषणा केली होती. शनिवारी (16 मार्च) निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी पुष्टी केली की आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याचे सामनेही भारतातच होणार आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी यंदा सात टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होईल. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही बीसीसीआयला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. मात्र त्यावर्षी देखील आयपीएलचा संपूर्ण हंगाम भारतातच खेळला गेला होता.

बीसीसीआयच्या एका सूत्रानं सांगितलं की, आता निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं असल्यानं आम्ही त्या आधारे पुढील कार्यक्रम तयार करत आहोत. मतदानाचे सात टप्पे आहेत. त्यामुळे ज्या टप्प्यात जेथे मतदान असेल, त्या टप्प्यात आम्ही तेथे सामने घेणार नाही. उदाहरणार्थ, जेव्हा लखनऊ आणि कोलकाता येथे मतदान असेल, तेव्हा आपण अहमदाबाद किंवा दिल्ली येथे सामने घेऊ शकतो. जेव्हा उत्तरेकडील राज्यांमध्ये निवडणुका होतील तेव्हा आम्ही दक्षिणेकडील राज्यांमध्ये सामने आयोजित करू. मात्र यामुळे स्पर्धेचं होम-अवे स्वरूप पूर्णपणे पाळलं जाऊ शकत नाही.

बीसीसीआयनं यापूर्वी 22 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान होणाऱ्या आयपीएल 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. स्पर्धेचा सलामीचा सामना शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध आहे. हा सामना गुजरातच्या अहमदाबाद येथे खेळला जाईल. आयपीएल सुरू होण्यासाठी आता केवळ पाच दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत सर्व संघांनी तयारी सुरू केली असून खेळाडू त्यांच्या संघांच्या शिबिरात सामील झाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

IPL 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! 4.60 कोटी रुपयांना खरेदी केलेला स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

लक्ष्य सेनचं स्वप्न भंगलं, ‘ऑल इंग्लंड ओपन’ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव

एवढ्या भीषण अपघातानंतर अवघ्या 14 महिन्यांत कसा तंदुरुस्त झाला ऋषभ पंत? डॉक्टरांनी सांगितली संपूर्ण कहाणी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---