Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘शाळेतील पोरीची चूक’, म्हणणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गजाला हरमनप्रीतचे सडेतोड प्रत्युत्तर; काय म्हणाली वाचाच

'शाळेतील पोरीची चूक', म्हणणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गजाला हरमनप्रीतचे सडेतोड प्रत्युत्तर; काय म्हणाली वाचाच

February 24, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Harmanpreet Kaur

Photo Courtesy: Twitter/@ICC


गुरुवारी (दि. 23 फेब्रुवारी) महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना पार पडला. भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ या सामन्यात आमने-सामने होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 5 धावांच्या फरकाने पराभूत करत सामना खिशात घातला. या सामन्याला कलाटणी देणारा क्षण कर्णधार हरमनप्रीत कौर हिचे धावबाद होणे ठरले. ती धाव घेताना व्यवस्थितरीत्या क्रीझच्या आत बॅट ठेवू शकली नाही आणि बाद झाली. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी शाळेतील मुलीची चूक म्हटले. याबाबत जेव्हा हरमनप्रीतला विचारणा केली, तेव्हा तिने सडेतोड प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाली हरमनप्रीत?
कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) म्हणाली की, “कधी-कधी असे होते. मी क्रिकेटमध्ये अनेकदा असे पाहिले आहे. जेव्हा फलंदाज अशाप्रकारे धाव घेत असतात, आणि कधी-कधी बॅट तिथे फसते. हे दुर्दैवी होते. मात्र, मला वाटत नाही की, ही शाळेतील मुलीसारखी चूक होती. कारण, आम्ही आता समजूतदार आहोत. आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहोत. हे आमच्यासाठी दुर्दैवी होते. मात्र, काही गोष्टी आहेत, ज्या आम्हाला सुधारण्याची गरज आहे.”

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

पुढे बोलताना हरमनप्रीत म्हणाली की, “ही निश्चितच एक निराशा होती. कारण, ज्याप्रकारे मी फलंदाजी करत होते, कदाचित हीच एकमेव संधी होती, ज्यामुळे मी बाद होऊ शकत होते. नसता, ज्याप्रकारे मी चेंडूला मारत होते, त्यानुसार मी हा डाव शेवटपर्यंत घेऊन जाऊ शकत होते.”

सामन्याचा आढावा
सामन्याबाबत बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलिया संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने बेथ मूनीच्या अर्धशतक आणि कर्णधार मेग लॅनिंग (Meg Lanning) हिच्या 49 धावांच्या जोरावर 20 षटकात 4 विकेट्स गमावत 172 धावा केल्या होत्या. शेवटच्या 10 षटकात ऑस्ट्रेलिया संघाने 100हून अधिक धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया यांना दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही. जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरमनप्रीत कौर यांनी वादळी खेळी केली. मात्र, त्यांनाही तंबूत परतावे लागले. यादरम्यान जेमिमाने 24 चेंडूत 43, तर हरमनप्रीतने 34 चेंडूत 52 धावांचे योगदान दिले. भारताला या सामन्यात 20 षटकात 167 धावाच करता आल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना 5 धावांनी खिशात घातला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कारकिर्दीतील 9व्या इनिंगमध्ये हॅरी ब्रुकचा विश्वविक्रम, भारतीय दिग्गजाचा मागे टाकत केल्या सर्वाधिक धावा
ते परत येतायेत! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंची लीजेंड्स लीग ‘या’ तारखेपासून होतेय सुरू


Next Post
Photo Courtesy: Twitter/ICC

सचिनच्या 'ऐतिहासिक' वनडे द्विशतकाची 13 वर्ष! आजच्याच दिवशी केलेला कारनामा

Photo Courtesy: Twitter/englandcricket

आठ महिन्यांनंतर जो रूटचे कसोटी शतक! डॉन ब्रॅडमनच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी

Sarah-Taylor-On-Lesbian

विराटला प्रपोज करणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटरचा खळबळजनक खुलासा; म्हणाली, 'मी तर...'

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143