WPLक्रिकेटटॉप बातम्या

WPL 2024 : मुंबई इंडियन्सने टॉस जिंकत घेतली फलंदाजी, पाहा प्लेइंग 11

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्रत्येक सामन्याती निकाल गुणतालिकेवर प्रभाव टाकत आहे. मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स यांच्यात सामना होत आहे. दोन्ही संघ स्पर्धेत दुसऱ्यांदा आमनेसामने येत आहे. पहिल्या सामन्यात युपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सला पराभवाचं पाणी पाजलं होतं. मात्र आता या सामन्यात कोण बाजी मारते याकडे लक्ष लागून आहे.

याबरोबरच, नाणेफेकीचा कौल युपी वॉरियर्सच्या बाजूने लागला. बंगळुरुनंतर आता दिल्लीत पहिल्यांदा फलंदाजी करणं जास्त प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे. त्यानुसार मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणाली, “आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. शेवटच्या दोन सामन्यांमध्ये दव नाही, हेच एकमेव कारण आहे. दव असताना पाठलाग करणे हा उत्तम पर्याय आहे, अन्यथा स्वतःवर दबाव का ठेवायचा. आम्ही त्याच टीमसोबत जात आहोत.” तर एलिसा हिली म्हणाली की, “दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. त्यामुळे नाणेफेकीने काही फरक पडत नाही. शेवटचे दोन सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत परंतु प्रथम गोलंदाजी करण्यास आमची हरकत नाही. हा एका वेळी एकच खेळ आहे आणि त्यावर लक्ष केंद्रित करा, उद्याच्या खेळाचा नंतर विचार करा.”

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, एस सजना, हुमैरा काझी, शबनीम इस्माईल, सायका इशाक.

यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (विकेटकीपर/कर्णधार), किरण नवगिरे, चमारी अथापथू, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, दीप्ती शर्मा, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, उमा चेत्री, राजेश्वरी गायकवाड, सायमा ठाकोर.

महत्वाच्या बातम्या – 

 

Related Articles