के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये नांदेड संघाचा दुसरा विजय

पुणे (7 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 च्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात नांदेड विरुद्ध जालना या लढतीने झाली. नांदेडच्या याकूब पठाण ने आपल्या पहिल्या चढाईतच सुपर रेड करत सामन्याची जोरदार सुरुवात केली. सलग चढाया करत चौथ्या मिनिटाला जालना संघाला ऑल आऊट करत नांदेड संघाने 9-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सुनिल राठोड आणि त्यांच्या साथीदारांनी नांदेड संघाला काही गुण मिळवून दिले.
सामन्याच्या दहाव्या मिनिटाला नांदेड संघाकडून बदली खेळाडू म्हणून आलेल्या विशाल बेडके ने सुपर रेड करत पुन्हा एकदा आघाडी वाढवली. त्यात पाठोपाठ शक्ती शेमके ने सुद्धा सुपर रेड करत जालना संघाला ऑल आऊट केले. नांदेड संघाने 23-09 अशी निर्यायक आघाडी मध्यंतराला घेतली होती. मध्यंतरा नंतर नांदेड संघाने आक्रमक खेळ सुरू ठेवत आपली आघाडी वाढवली.
नांदेड संघाकडे 36-16 निर्यायक आघाडी शेवटच्या पाच मिनिटापूर्वी होती. याकुब पठाण ने अष्टपैलू खेळ करत नांदेड संघाला 46-17 असा दुसरा विजय मिळवून दिला. याकुब पठाण ने सर्वाधिक 15 गुण मिळवून दिले. तर शक्ती शेडमके ने 9 गुण मिळवत चांगली साथ दिली. निसार पठाण हाय फाय पूर्ण केला. जालना कडून शुभम चव्हाण ने सर्वाधिक 5 गुण मिळवले. जालना संघाचा हा सलग तिसरा पराभव ठरला. (K. M. P. Second win for Nanded team in Yuva Kabaddi series)
बेस्ट रेडर- याकुब पठाण, नांदेड
बेस्ट डिफेंडर- निसार पठाण, नांदेड
कबड्डी का कमाल- अजय राठोड व सुनिल राठोड, जालना
महत्वाच्या बातम्या –
प्रीतीला पाहताक्षणी 13 वर्षाचा अश्विन प्रेमात पडला होता! जाणून घ्या क्रिकेटच्या ‘अण्णा’ची फिल्मी लव्ह स्टोरी
के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये अहमदनगर, बीड संघाचा सलग दुसरा विजय