इंग्लंडचा भारत दौराक्रिकेटटॉप बातम्या

IND vs ENG : पाचव्या कसोटीत भारताची पहिल्या दिवशीच मजबूत पकड; रोहित अन् यशस्वीची अर्धशतके

पाचव्या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव 218 धावात संपुष्टात आणत दिवसअखेर भारतीय संघाने 1 बाद 135 धावा केल्या आहेत. तसेच पहिल्या डावात भारत अजूनही 83 धावांनी पिछाडीवर आहे. त्याआधी भारताकडून दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतकीय खेळी केल्या आहेत. यामध्ये जयस्वालने 57 धावाकाडून बाद झाला आहे. तर रोहित शर्माने नाबाद 52 धावांवर खेळत आहे.

याआधी कुलदीप यादवने 5 आणि आपला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनने 4 विकेट्स घेत इंग्लंडचा पहिला डाव दोन सत्रातच 218 धावांवर संपला आहे. तर इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्राऊलने सर्वाधिक 79 धावा केल्या आहेत. तसेच भारतीय संघाकडून  फिरकी गोलंदाजांनीच सर्वच्या सर्व 10 विकेट्स घेतल्या आहेत.

याबरोबरच इंग्लंडची सुरुवात जोरदार झाली होती. यात बेन डकेट आणि झॅक क्रॉली या दोघांनी 64 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर बेन डकेट 27 धावांवर आऊट झाला. त्यानंतर इंग्लंडलने ओली पोप याच्या रुपात दुसरी विकेट गमावली. झॅक क्रॉली आऊट झाल्याने इंग्लंडची स्थिती 3 बाद 137 झाली. क्रॉलीने सर्वाधिक 79 धावांची खेळी केली. क्रॉली आऊट झाल्यानंतर इंग्लंडचा डाल गडगडला. इंग्लंडने पुढील 7 विकेट्स या 43 धावांच्या मोबदल्यात गमावल्या आहेत.

दरम्यान, पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला होता. मात्र टीम इंडियाच्या फिरकी जोडीने ठराविक अंतराने झटके देत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं आहे.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

महत्वाच्या बातम्या – 

Related Articles