भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशीत भारताने इंग्लंडचा पहिला डाव संपला आहे. तसेच पहिल्या दिवसाची दोन सत्रे कशीबशी खेळणाऱ्या इंग्लंडचा संपूर्ण संघ 218 धावात गारद झाला आहे. तर भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने 5 तर आपला 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या अश्विनने 4 विकेट्स घेतल्या आहेत. तर जडेजाने एक विकेट घेतली आहे.
याबरोबरच, भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने या सामन्यात रन मशिन विराट कोहलीचा एक मोठा विक्रम मोडला आहे. त्याने भारताकडून इंग्लंविरूद्धच्या एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. तसेच यशस्वी जयस्वालने चौथ्या कसोटी सामन्यातच विराट कोहलीच्या 655 धावांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आज पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने आपला पहिला डाव सुरू केला. यशस्वीने एक धाव घेताच तो इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव 218 धावांवर संपुष्टात आला. कुलदीप यादवने भेदक गोलंदाजी करत इंग्लंडचा निम्मा संघ बाद केला असून 15 षटकात 72 धावा देत 5 गडी बाद केले आहेत. यासह कुलदीप यादवने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 50 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. कसोटीत चौथ्यांदा पाच गडी बाद करण्याचा विक्रम केला. तसेच विकेट्सचं अर्धशतकही पूर्ण केलं आहे. तर कुलदीप यादव मागच्या 100 वर्षात कमी चेंडूवर 50 गडी बाद करणार गोलंदाज ठरला आहे. तसेच तिन्ही फॉर्मेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा भारताचा पाचवा गोलंदाज आहे.
दरम्यान, पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडची सुरुवात जोरदार झाली होती. बेन डकेट आणि झॅक क्रॉली या दोघांनी 64 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर बेन डकेट 27 धावांवर आऊट झाला. त्यानंतर इंग्लंडलने ओली पोप याच्या रुपात दुसरी विकेट गमावली. तर झॅक क्रॉली आऊट झाल्याने इंग्लंडची स्थिती 3 बाद 137 झाली होती. यावेळी क्रॉलीने सर्वाधिक 79 धावांची खेळी केली होती. त्यानंतर क्रॉली आऊट झाल्यानंतर इंग्लंडचा डाल गडगडला असून इंग्लंडचे पुढील 7 विकेट्स फक्त 43 धावांमध्येच गेल्या आहेत.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.