गुरुवारी (7 मार्च) भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांनी अक्षरशः कमाल केली. धरमशाला कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा घाम काढण्याची जबाबदारी भारतीय फिरकीपटूंनी घेतली होती. ही जबाबदारी कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा यांनी चोख पार पाडली. तिन्ही फिरकीपटूंनी पहिल्या डावात इंग्लंडच्या 10 विकेट्स वाटून घेतल्या. इंग्लंडला सर्वबाद केल्यानंतर अश्विन आणि कुलदीपमध्ये एका खास कारणास्तव तुझे-माझे झाले. पण या भांडनात एकमेकांविषयी आदर आणि प्रेम स्पष्टपणे पाहायला मिळाले.
धरमशाला कसोटीच्या पहिल्या दिवशी नामेफेक इंग्लंडने जिंकली आणि भारताला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लंड संघाचा पहिला डाव 218 धावांवर गुंडाळला. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने 5, तर रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने 4 विकेट्स नावावर केल्या. कुलदीपसाठी हा कसोटी कारकिर्दीतील चौथ्यांदा फाईव्ह विकेट हॉल घेत आहे. दुसरीकडे अश्विनचाही कसोटी कारकिर्दीतील हा 100वा सामना आहे, ज्यामध्ये त्याने पहिल्याच दिवशी चार विकेट्स घेतल्या.
क्रिकेटच्या मैदानात नेहमी असे पाहायला मिळते की, डावात सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करणारा गोलंदाज ड्रेसिंग रुममध्ये जाताना चेंडू आपल्या हातात घेऊन उंचावतो. अशात गुरुवारी इंग्लंडला सर्वबाद केल्यानतंर सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या कुलदीपने चेंडू हवेत उंचावला. असे असले तरी, कुलदीप यासाठी तयार नव्हता. त्याने 100वा कसोटी सामना खेळणाऱ्या अश्विनकडे चेंडू सोपवला होता. अश्विन कुलदीपपेक्षा जास्त अनुभवी आहे आणि कारकिर्दीतील खास कसोटी सामन्यात त्याने चार विकेट्स देखील घेतल्या होत्या. अशात कुलदीपने मनातील आदर दाखवत चेंडू अश्विनकडे टाकला. पण अश्विनने देखील त्याच्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला. चेंडू हातात येताच, त्याने दुसऱ्या क्षणी कुलदीपकडे मागारी केला. हा व्हिडिओ बीसीसीआयच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून शेअर केला गेला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस या पोस्टवर पाहायला मिळू शकतो.
𝙈𝙤𝙢𝙚𝙣𝙩𝙨 𝙇𝙞𝙠𝙚 𝙏𝙝𝙚𝙨𝙚!
R Ashwin 🤝 Kuldeep Yadav
Follow the match ▶️ https://t.co/jnMticF6fc #TeamIndia | #INDvENG | @ashwinravi99 | @imkuldeep18 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/hJyrCS6Hqh
— BCCI (@BCCI) March 7, 2024
धरमशाला कसोटीसाठी दोन्ही संघ –
भारताची प्लेइंग इलेव्हन – यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल (पदार्पण), रविंद्र जडेजा, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन – झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (यष्टीरक्षक), टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन, शोएब बशीर.
महत्वाच्या बातम्या –
IPL 2024 : RCB चा एबी डिव्हिलियर्स IPL 2024मध्ये करणार पुनरागमन, पाहायला मिळणार नव्या भूमिकेत
आगे बढेगा…आगे बढेगा..! धोनी’च्या स्टाईलमध्ये ध्रुव जुरेलने आधीच केला इशारा आणि ओली पोप अडकला जाळ्यात