---Advertisement---

शुबमन गिलच्या दुखापतीबाबत बीसीसीआयचे अपडेट, जाणून घ्या कधी मैदानात परतणार

On: शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024 12:30 PM
---Advertisement---

टीम इंडियाचा अनुभवी आणि प्रतिभावान फलंदाज शुबमन गिल पर्थ कसोटीचा भाग नाही. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. गिल दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गिलच्या दुखापतीबाबत अपडेट दिले आहे. ज्यात सामन्यापूर्वी सराव करताना शुभमनला दुखापत झाली होती. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. असे म्हटंले आहे.

जसप्रीत बुमराह पर्थ कसोटीत टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयने नाणेफेकीनंतर गिलच्या दुखापतीबाबत अपडेट शेअर केले. बीसीसीआयने एक्सवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “शूबमन गिलला सराव सत्राच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दुखापत झाली होती. त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीसाठी त्याच्या निवडीचा विचार करण्यात आला नाही. बीसीसीआय मेडिकल त्याच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे.”

गिलच्या दुखापतीनंतर त्याचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले. मात्र कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून गिल मैदानात परतू शकतो. मात्र, त्याच्या परतण्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा देखील पर्थ कसोटीचा भाग नाही. त्याची पत्नी रितिका सजदेहने अलीकडेच एका मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे रोहित कुटुंबासोबत आहे. मात्र ताज्या बातमीनुसार दुसऱ्या कसोटीत तो मैदानात परतू शकतो. अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा-

हा कसला किंग? ऑस्ट्रेलियातही विराट कोहलीची बॅट चालेना, पुन्हा एकदा स्वस्तात बाद!
IND VS AUS; थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे गदारोळ! केएल राहुल बाद की नाबाद? तुम्हीच सांगा, पाहा VIDEO
ठरलं..! आयपीएल 2025 या दिवशी सुरू होणार, पुढील तीन वर्षांचे वेळापत्रक समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---