अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या नव्या पर्वाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. तर या हंगामापूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन फॉर्ममध्ये परतला आहे. डावखुरा स्फोटक फलंदाज शिखर धवन सध्या डीवाय पाटील टी-20 चषक स्पर्धेत धुमाकूळ घालत आहे.
याबरोबरच शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने भारतासाठी शेवटचा सामना 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला होता. यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही. तसेच शिखर धवनने या खेळीनंतर त्याने 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघात येण्यासाठी दावा ठोकला आहे.
तर आयपीएल 2024 मध्ये शिखर धवन आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार आहे. शिखर धवनने आयपीएल 2023 मध्ये अप्रतिम फलंदाजी केली, पण तरीही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नाही. मात्र, सध्या शिखर घवान डीवाय पाटील टी-20 चषकात डीवाय पाटील ब्लूकडून खेळत असताना त्याने या सामन्यात 51 चेंडूंचा सामना करत 99 धावांची नाबाद खेळी केली आहे. तर या सामन्यात धवन फक्त 1 एका धावेने आपले शतक पूर्ण करू शकला नाही. तर या खेळीमुळे शिखर धवनचे चाहते खूप खुश दिसत आहेत. तर पंजाब किंग्जचे चाहतेही त्यांच्या कर्णधाराला फॉर्ममध्ये परतताना पाहून खूप खूश झाले आहेत.
अशातच शिखर धवन बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाबाहेर आहे. यावेळी केंद्रीय करारातही त्यांचा समावेश करण्यात आला नाही. तसेच धवनला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातूनही बाहेर काढण्यात आले होते. जर त्याने आयपीएलमध्ये अप्रतिम फलंदाजी केली आणि त्याच्या बॅटमधून मोठी खेळी केली तर 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी त्याचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.
https://twitter.com/PunjabKingsCult/status/1765657008831627672
दरम्यान, 2 जूनपासून T20 विश्वचषक 2024 चे आयोजन यूएसए आणि वेस्ट इंडिज सुरू होणार आहे. तसेच इतिहासात प्रथमच यूएसए कोणत्याही आयसीसी स्पर्धेचे आयोजन करताना दिसणार आहे. तर या स्पर्धेत वेस्ट इंडिज तिसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवणार आहे. तसेच T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडशी होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यात 9 जूनला सामना पाहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- वडिलांनी आत्महत्या केली, आईला कॅन्सर झाला; ‘बेझबॉल’चा पोस्टर बॉय बेअरस्टोचा 100 कसोटीपर्यंतचा प्रवास
- Rohit Sharma । WTC मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा रोहित पहिलाच भारतीय, डावाच्या सुरुवातीलाच केला विक्रम