---Advertisement---

गौतम गंभीरला एमएस धोनीला आपल्या खुर्चीवर का बसवायचं आहे? दिग्गज कर्णधाराबाबत गंभीरने केलं मोठं विधान!

On: सोमवार, मार्च 16, 2026 9:30 PM
MS-Dhoni-And-Gautam-Gambhir
---Advertisement---

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 (icc T20 international world cup 2026) मध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर, माजी कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) हसण्यावरून एक मजेशीर टिप्पणी केली होती. आता यावर गंभीरने आपली प्रतिक्रिया देताना एक मोठी इच्छा व्यक्त केली आहे.

एका कार्यक्रमादरम्यान गंभीरला धोनीच्या त्या पोस्टबद्दल विचारण्यात आले. त्यावर उत्तर देताना गंभीर म्हणाला, धोनी वर्ल्ड कपचा फायनल पाहण्यासाठी आला आणि त्याने मला हसण्यास सांगितले, ही चांगली गोष्ट आहे. पण माझी इच्छा आहे की एके दिवशी आमची ही भूमिका बदलली जावी. मला आशा आहे की भविष्यात कधीतरी धोनी माझ्या जागी भारताचा ‘हेड कोच’ असेल आणि मी त्याला शुभेच्छा देईन. तेव्हा तो डगआऊटमध्ये हसताना दिसेल.

गौतम गंभीरचा टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ 2027 च्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत आहे. जर टीम इंडियाने 2027 चा वर्ल्ड कप जिंकला, तर गंभीरचा कार्यकाळ 2028 चा टी-20 वर्ल्ड कप आणि 2028 च्या ऑलिम्पिकपर्यंत वाढवला जाऊ शकतो. आयपीएल 2026 संपल्यानंतर गंभीर 2027 च्या वनडे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करेल.

क्रिकेट चाहते सध्या धोनीला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 30 मार्च रोजी आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात धोनी खेळताना दिसू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---