---Advertisement---

IND Vs ENG : मुशीर खानने सरफराज खानचे गुपित केले उघड, सांगितला आऊट करण्याचा प्लन,’ म्हणाला..

---Advertisement---

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या दोन खान बंधू चर्चेत आहेत. एक सरफराज खानने इंग्लंड मालिकेच्या मध्यात राजकोट कसोटीत पदार्पण केले आणि पहिल्याच कसोटी सामन्याने तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. तर दुसरीकडे, सरफराजचा धाकटा भाऊ मुशीर खान अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये चर्चेत आला होता. विश्वचषकानंतर मुशीर रणजी ट्रॉफीमध्येही आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. दरम्यान, त्यांनी एक मुलाखत दिली असून त्यामध्ये त्याने अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पण यात सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याने सरफराज खानचे गुपित उघडे केले आहे.

याबरोबरच, एका मुलाखतीत सर्फराज खानला बाद करण्याची पद्धत सांगताना मुशीर खान म्हणाला आहे की, ‘त्याच्या आक्रमकतेला मोडीत काढणे ही संयमाची परीक्षा असते. भावाच्या मनाशी खेळावे लागते. त्याच्याकडे भरपूर शॉट्स आहेत, तुम्हाला त्याच्या संयमाने खेळावे लागणार आहेत. तसेच पुढे बोलताना मुशीर खान म्हणाला आहे की, ‘तो ऑफ स्टंपच्या बाहेर उडणारा चेंडू टाकू शकतो. तसेच, त्याला अशा चेंडूवर स्लॉग स्वीप किंवा फाइन लेग खेळण्यास भाग पाडा जेणेकरून तो झेलबाद होऊ शकेल.”

दरम्यान, सरफराज खानबद्दल सांगायचे झाले तर राजकोट कसोटीत पदार्पण करताना त्याने 62 आणि नाबाद 68 धावांची खेळी केली होती. त्यानंतर तो रांची कसोटीला त्याच्याकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. पण तिथे सरफराजने पहिल्या डावात 14 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात त्याला खातेही उघडता आले नाही. त्यामुळे त्याच्यावर धर्मशालामध्ये धावा करण्याचे अधिक दडपण असणार आहे. तसेच आता या आव्हानात्मक खेळपट्टीवर तो कसा खेळतो हे बघावे लागणार आहे. तर पाचव्या कसोटी सामन्याच्या  पहिल्याच दिवशी तिसऱ्या सत्रात इंग्लिश फलंदाज 218 धावांवर गडगडला आहे. तर आता भारताने चांगली सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---