---Advertisement---

कारकिर्दीतील 9व्या इनिंगमध्ये हॅरी ब्रुकचा विश्वविक्रम, भारतीय दिग्गजाचा मागे टाकत केल्या सर्वाधिक धावा

On: शुक्रवार, फेब्रुवारी 24, 2023 3:35 PM
Harry Brook
---Advertisement---

इंग्लंड संघ सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला असून शुक्रवारी (24 फेब्रुवारी) त्याने उभय संघांतील दुसरा कसोटी सामना सुरू झाला. दुसऱ्या कसोटीच्या पहिला दिवस इंग्लंड संघासाठी खास ठरला. युवा फलंदाज हॅरी ब्रुक याने शतक ठोकत दिग्गजांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावला.

हॅरी ब्रुक (Harry Brook) याने मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कसोटी पदार्पण केले. पदार्पणानंतर त्याने आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले अशून शुक्रवारी सहावा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स (Ben Stokes) याने नाणेफेक गमावल्यानंतर या सामन्यात संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. न्यूझीलंडने या दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात जबरदस्त केली. संघाची धावसंख्या 21 असताना इंग्लंडच्या पहिल्या तीन फलंदाजांनी विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर चौथ्या क्रमांकावर जो रुट (Joe Root)आणि पाचव्या क्रमांकावर हॅरी ब्रुक इंग्लंडचा डाव सावरला. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी ब्रुक आणि रुटने स्वतःची शतके पूर्ण केली.

जो रुट 101, तर हॅरी ब्रुक 184 धावा करून खेळपट्टीवर कायम आहेत. ब्रुकच्या कसोटी कारकिर्दीतील ही 9वी इनिंग होती, ज्यात त्याने शतक ठोकले. सोबतच एक खास विक्रम देखील केला. कसोटी कारकिर्दीतील पहिल्या 9 इनिंगमध्ये सर्वाधिक षतकांच्या बाबतीत एव्हर्टन विक्स, जॉर्ज हेडली, हर्बर्ट सटक्लिफ, सुनील गावस्कर आणि विनोद कांबळी यांची बरोबरी केली आहे. या सर्वांनी कारकिर्दीतील पहिल्या 9 कसोटी इनिंग्जमध्ये प्रत्येकी चार चार शतके केली होती. बॅरी ब्रुकने शुक्रवारी केलेल्या शतकानंतर दिग्गजांच्या या यादीत जागा पक्की केली.

कारकिर्दीतील पहिल्या 9 कसोटी इनिंग्जमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
4: हॅरी ब्रुक*
4: एव्हर्टन विक्स
4: जॉर्ज हेडली
4: हर्बर्ट सटक्लिफ
4: सुनील गावस्कर
4: विनोद कांबळी

तसेच कारकिर्दीतील पहिल्या 9 कसोटी इनिंग्जमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत हॅरी ब्रुक सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. यादीत यापूर्वी पहिला क्रमांक 789 धावांसह भारतीय दिग्गज विनोद कांबळी याचा होता. पण शुक्रवारी ब्रुकने 807 धावा पूर्ण करून यादीत पहिला क्रमांक पटकावला. सध्या या यादीत तिसऱ्या क्रमांकावर हर्बर्ट सटक्लिक, चौथ्या क्रमांकावर सुनिल गावसकर आणि पाचव्या क्रमांकावर एव्हरटन विक्स आहेत.

कारकिर्दीतील पहिल्या 9 कसोटी इनिंग्जमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
807*- हॅरी ब्रूक (इंग्लंड)
798 – विनोद कांबळी (भारत)
780 – हर्बर्ट सटक्लिफ (इंग्लिश)
778 – सुनील गावस्कर (भारत)
777 – एव्हर्टन विक्स (वेस्ट इंडीज)

दरम्यान, उभय संघांतील या दुसरा कसोटी सामना वेलिंगटनमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवसी न्यूझीलंडने वेगवान सुरुवात मिळाली, पण रुट आणि ब्रुक जोडीने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने तीन बाद 315 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी रुट आणि ब्रुक इंग्लंडच्या डावाची सुरुवात करतील. या दोघांमध्ये सध्या 294 धावांची नाबाद भागीदारी झाली आहे. उद्या ही भागीदारी अजून किती पुढे जाणार, हे पाहाण्यासारखे असेल. (Harry Brooke holds the record for most runs in 9 Test innings in a career)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलिया जिंकणार? कर्णधारपद पुन्हा आले स्टीव्ह स्मिथच्या हाती
टीम साऊदीचा भीमपराक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या एकाही गोलंदाजाला जमली नाही ‘अशी’ कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---