---Advertisement---

ते परत येतायेत! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंची लीजेंड्स लीग ‘या’ तारखेपासून होतेय सुरू

Legends-League-Cricket
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या दिग्गज खेळाडूंना पुन्हा मैदानावर घेऊन येण्यासाठी एका लीगचे आयोजन केले जाते. ती लीग म्हणजेच लीजेंड्स लीग क्रिकेट होय. या लीगचे पहिले दोन हंगाम पार पडले आहेत, ज्यांना क्रिकेटप्रेमींनी भरभरून प्रेम दिले होते. अशात आता या लीगच्या तिसऱ्या हंगामाचीही तयारी जोरात सुरू झाली आहे. या स्पर्धेची सुरुवात एलएलसी मास्टर्सच्या रूपात 10 मार्चपासून होणार आहे.

शुक्रवारी (दि. 24 फेब्रुवारी) लीजेंड्स लीग क्रिकेटने एलएलसी मास्टर्स स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा 10 मार्च ते 20 मार्चदरम्यान खेळली जाणार आहे. या स्पर्धेचा पहिला सामना इंडिया महाराजा विरुद्ध आशिया लायन्स (India Maharajas vs Asia Lions) संघात खेळला जाणार आहे.

तीन संघांचा समावेश
यावेळी स्पर्धेत माजी दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेले 3 संघ भाग घेतील. यामध्ये इंडिया महाराजा, आशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स संघांच्या नावाचा समावेश आहे. हे 3 संघ साखळी सामन्यात एकमेकांशी प्रत्येकी 2 सामने खेळताना दिसतील. त्यानंतर प्लेऑफमध्ये दोन सामने खेळले जातील. साखळी सामन्यात पहिले स्थान पटकावणाऱ्या संघाला थेट अंतिम सामन्याचे तिकीट मिळेल. तसेच, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघांमध्ये एलिमिनेटर सामना होईल. त्यात जो संघ जिंकेल, तो अंतिम सामन्यात जागा मिळवेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सर्व सामने सायंकाळी 8 वाजता सुरू होतील आणि सर्व सामने दोहा येथील एशियन टाऊन क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळले जातील.

लीजेंड्स लीग क्रिकेटचे संचालक रवी शास्त्री यांनी स्पर्धेच्या तिसऱ्या हंगामाबाबत उत्साह व्यक्त केला आहे. तसेच, एलएलसी मास्टर्स किताबासाठी दिग्गजांमध्ये होणारे सामने पाहण्यासाठी उत्सुक आहेत. (legends league cricket announces schedule llc masters 2023 qatar read here)

लीजेंड्स लीग क्रिकेटच्या एलएलसी मास्टर्स स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक
10 मार्च, पहिला सामना – इंडिया महाराजा विरुद्ध आशिया लायन्स
11 मार्च, दूसरा सामना – इंडिया महाराजास विरुद्ध वर्ल्ड जायंट्स
13 मार्च, तीसरा सामना – वर्ल्ड जायन्ट्स विरुद्ध आशिया लायन्स
14 मार्च, पहला सामना – इंडिया महाराजास विरुद्ध आशिया लायन्स
15 मार्च, दुसरा सामना – इंडिया महाराजास विरुद्ध वर्ल्ड जायंट्स
16 मार्च, तिसरा सामना – वर्ल्ड जायन्ट्स विरुद्ध आशिया लायन्स
18 मार्च, एलिमिनेटर – दुसरे स्थान विरुद्ध तिसरे स्थान
20 मार्च, अंतिम सामना – पहिले स्थान विरुद्ध एलिमिनेटर विजेता

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टीम साऊदीचा भीमपराक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या एकाही गोलंदाजाला जमली नाही ‘अशी’ कामगिरी
ब्रेकिंग! तिसऱ्या कसोटीतून ऑस्ट्रेलियाचा आधारस्तंभ पॅट कमिन्स बाहेर, कोण करणार कॅप्टन्सी?
पराभवाचं दु:ख पचवू शकली नाही हरमनप्रीत, दिग्गज खेळाडूच्या गळ्यात पडून रडली ढसाढसा; तुम्हीही व्हाल भावूक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---