क्रिकेट चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आलाय. लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket ) याच्या नवीन हंगामाचे वेळापत्रक आणि स्थळ निश्चित झाले आहे. हा हंगाम पाच शहरांमध्ये खेळला जाणार आहे. ज्यामध्ये कोलकाता, दिल्ली, लखनऊ आणि जोधपूर यांचा समावेश आहे. तर प्लेऑफच्या सामन्यांसाठी शहरांची नावे नंतर घोषित केली जाणार आहे.
या स्पर्धेत भारताचे महाराजा आणि क्रिकेट विश्वातील खेळाडूंमध्ये एक सामना खेळला जाणार आहे. हा सामना भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाली याला समर्पित केला जाणार आहे. या सामन्यात महाराजा संघाचे नेतृत्व सौरव गांगुली (Sourav Ganguly) करणार आहे.
या हंगामात कोलकाताच्या इडन गार्डनमध्ये १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान तीन सामने खेळले जाणार आहेत. तर लखनऊ आणि जोधपूर येथे प्रत्येकी दोन-दोन सामने खेळले जाणार आहेत. तसेच बाकीच्या मैदानांवर तीन सामने आयोजित केले आहेत.
लीजेंड्स लीग क्रिकेटचे सह-संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष रमन रहेजा यांनी म्हटले, “आमच्या चाहत्यांची आणि प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. ही घोषणा केल्याने कोणता सामना पाहणार याची ते योजना बनवू शकतात. ऑनलाईन तिकीटांबाबतही लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. एक नवीन प्रकारचे क्रिकेट खेळण्यासाठी १० देशांतील दिग्गज खेळाडू तयार आहेत.”
कोणत्या शहरात आणि कधी होणार सामने याची संपूर्ण यादी
कोलकाता – १६ ते १८ सप्टेंबर, २०२२
लखनऊ – २१ ते २२ सप्टेंबर, २०२२
दिल्ली – २४ ते २६ सप्टेंबर, २०२२
कटक – २७ ते ३० सप्टेंबर, २०२२
जोधपूर – १ ते ३ ऑक्टोबर, २०२२
प्ले-ऑफ: ५,७ ऑक्टोबर, २०२२ – ठिकाण लवकरच घोषित केले जाईल
फाइनल मैच: ८ ऑक्टोबर, २०२२ – ठिकाण लवकरच घोषित केले जाईल
भारत महाराजा संघ
सौरव गांगुली (कर्णधार), विरेंद्र सेहवाग, युसूफ पठान, मोहम्मद कैफ, सुब्रमण्यम बद्रीनाथ, इरफान पठान, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंथ, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक डिंडा, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंग, जोगिंदर शर्मा, रीतिंदर सिंग सोढ़ी.
रेस्ट ऑफ द वर्ल्ड संघ
ओएन मॉर्गन (कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्युलम, जाॅन्टी रोड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकाद्जा, मश्रफे मोर्तजा, असगर अफगान, मिशेल जॉनसन, ब्रेट ली, केविन ओ’ब्रायन, दिनेश रामदीन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाच्या टी२० स्पेशालिस्टला करायचयं कसोटी संघात पुनरागमन; भारताबद्दल म्हणाला…
‘दीपक हुड्डासोबत प्रॅक्टिस सेशन परवडत नव्हते, तो बॉल थेट…’, प्रशिक्षकांनीच दिले स्पष्टीकरण
मोठी बातमी। सानिया मिर्झाने यूएस ओपनमधून घेतली माघार! पोस्ट करत सांगितले खरे कारण