Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके मारणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये रूट ‘या’ स्थानी, विराट टॉपला कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके मारणाऱ्या सक्रिय खेळाडूंमध्ये रूट 'या' स्थानी, विराट टॉपला कायम

February 24, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Joe-Root-And-Virat-Kohli

Photo Courtesy: Twitter/ICC & englandcricket


आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या नावावर एक ना एक विक्रम नक्कीच असतो. मात्र, तो खेळाडू जस जसा स्वत:च्या खेळावर काम करतो, तसा यशाची शिखरे चढत जातो. फलंदाजांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके मारण्याचा विक्रम भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. असे असले, तरीही सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. मात्र, सक्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके करणारे खेळाडू कोण आहेत, याचा शोध आपण या लेखातून घेऊया…

सध्या इंग्लंड क्रिकेट संघ न्यूझीलंड दौऱ्यावर (England Tour of New Zealand) आहे. या दौऱ्यात इंग्लंडला न्यूझीलंडविरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. यातील पहिला सामना पार पडला आहे, तर दुसरा सामना खेळला जात आहे. या कसोटीला शुक्रवारपासून (दि. 24 मार्च) सुरुवात झाली. यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाकडून जो रूट (Joe Root) याने शानदार शतक झळकावले आहे. त्याने यादरम्यान 182 चेंडूंचा सामना करत नाबाद 101 धावा कुटल्या आहेत. यामध्ये 7 षटकारांचा समावेश होता. हे त्याचे 27वे कसोटी शतक होते.

THE GREATEST ❤️

Scorecard: https://t.co/k4ss5jWzMY

🇳🇿 #NZvENG 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 pic.twitter.com/UCKFn8Cjpm

— England Cricket (@englandcricket) February 24, 2023

अशाप्रकारे रूटने शतक ठोकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. तो या यादीत संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. त्याने आतापर्यंत 45 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. या यादीत अव्वलस्थानी विराट कोहली (Virat Kohli) आहे. विराटने आतापर्यंत 74 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत. तसेच, रूटसह डेविड वॉर्नर (David Warner) दुसऱ्या स्थानी आहे. त्यानेही 45 शतके केली आहेत. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) तिसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत 43 शतके झळकावली आहेत. (Virat Kohli has Most international centuries among active players)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे सक्रिय खेळाडू
74 – विराट कोहली
45 – जो रूट
45 – डेविड वॉर्नर
43 – रोहित शर्मा

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ते परत येतायेत! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंची लीजेंड्स लीग ‘या’ तारखेपासून होतेय सुरू
टीम साऊदीचा भीमपराक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडच्या एकाही गोलंदाजाला जमली नाही ‘अशी’ कामगिरी


Next Post
Harry Brook

कारकिर्दीतील 9व्या इनिंगमध्ये हॅरी ब्रुकचा विश्वविक्रम, भारतीय दिग्गजाचा मागे टाकत केल्या सर्वाधिक धावा

Harmanpreet Kaur

'शाळेतील पोरीची चूक', म्हणणाऱ्या इंग्लंडच्या दिग्गजाला हरमनप्रीतचे सडेतोड प्रत्युत्तर; काय म्हणाली वाचाच

Photo Courtesy: Twitter/ICC

सचिनच्या 'ऐतिहासिक' वनडे द्विशतकाची 13 वर्ष! आजच्याच दिवशी केलेला कारनामा

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143