रविवारी (दि. 19 फेब्रुवारी) दिल्ली येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली. भारताने दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने ऑस्ट्रेलिया संघाचा धुव्वा उडवला. या विजयासह भारताने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. या सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी रवींद्र जडेजा याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयात भारताच्या अनेक खेळाडूंनी विक्रमांचे मनोरे रचले. त्या खेळाडूंमध्ये भारतीय संघाचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्या नावाचाही समावेश आहे.
रवींद्र जडेजाची दुसऱ्या सामन्यातील कामगिरी
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने या सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 21 षटके गोलंदाजी करताना 68 धावा खर्च करत 3 विकेट्स चटकावल्या होत्या. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना 12.1 षटकात 47 धावा खर्च करत सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त फलंदाजी करताना त्याने पहिल्या डावात 74 चेंडूत 4 चौकारांच्या साहाय्याने 26 धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळण्यापूर्वीच भारताने सामना नावावर केला होता. अशाप्रकारे जडेजाच्या गोलंदाजीतील प्रदर्शनामुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
जडेजाने सामनावीर पुरस्कार पटकावताच त्याच्या नावावर विक्रम नोंदवला गेला. तो भारतात सर्वाधिक कसोटी सामनावीर पुरस्कार जिंकणारा संयुक्तरीत्या दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला. त्याने आतापर्यंत 8 वेळा हा पुरस्कार नावावर केला आहे. या यादीत अव्वलस्थानी भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे (Anil Kumble) आहे. त्याने सर्वाधिक 9 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. त्यानंतर संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि रवींद्र जडेजा आहेत. दोघांनीही प्रत्येकी 8 वेळा हा पुरस्कार पटकावला आहे. तसेच, या यादीत तिसऱ्या स्थानी माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आहे. त्याने 7 वेळा भारतात कसोटी सामना खेळताना 7 वेळा सामनावीर पुरस्कार पटकावला आहे. (Ravindra Jadeja Most player of the match awards in India in Tests)
भारतात कसोटी खेळताना सर्वाधिक सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू
9 वेळा- अनिल कुंबळे
8 वेळा- सचिन तेंडुलकर
8 वेळा- रवींद्र जडेजा*
7 वेळा- विराट कोहली
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी धावसंख्या न करताही रोहितच्या नावावर भन्नाट विक्रमाची नोंद, सचिन-हेडनच्या यादीत गाठले तिसरे स्थान
स्वतःची 100वी कसोटी खेळताना पुजाराने मिळवून दिली विजय, याआधी अशी कामगिरी करणारे फक्त…