---Advertisement---

रूटने भिरकावला खणखणीत रिव्हर्स स्कूप षटकार, पाहून बोलँडच्याही चेहऱ्याचा उडाला रंग- व्हिडिओ

Scott-Boland-And-Joe-Root
---Advertisement---

जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023-25 या सायकलमधील पहिल्या कसोटी मालिकेची सुरुवात इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिकेने झाली आहे. शुक्रवारपासून (दि. 16 जून) ऍशेस मालिकेतील पहिला सामना उभय संघात खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. तसेच, इंग्लंड संघाने जबरदस्त सुरुवातही केली. या सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट चमकला. त्याने नाबाद राहत शानदार शतक झळकावली. त्यापूर्वी त्याने खणखणीत षटकार ठोकत 59वे अर्धशतक झळकावले. त्या षटकाराची चर्चा जगात रंगली आहे.

जो रूट (Joe Root) याने सामन्यात हॅरी ब्रूक (Harry Brook) याच्यासोबत अर्धशतकी आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) याच्यासोबत शतकी भागीदारी रचली. रूटने डावातील 53व्या षटकात स्कॉट बोलँड याच्या चेंडूवर रिव्हर्स स्कूप (Joe Root Reverse Scoop) षटकार मारला. बोलँड याने टाकलेल्या फुलर ऑफसाईटच्या चेंडूवर रिव्हर्स स्कूपवरून षटकार खेचला. या शॉटनंतर गोलंदाजही हैराण झाला.

इंग्लंडचा पहिला डाव
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना तीन फलंदाज चमकले. पहिल्या डावात इंग्लंडसाठी रूटनेच सर्वाधिक धावा केल्या. सलामीवीर झॅक क्राऊले याने खणखणीत अर्धशतक झळकावले. त्याने 73 चेंडूत 7 चौकारांसह 61 धावांची खेळी साकारली. त्याच्यानंतर जो रूट (Joe Root Century) याने 152 चेंडूंचा सामना करत 4 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 118 धावा केल्या. तसेच, यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो यानेही बॅटमधून दम दाखवत 78 चेंडूत 78 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 12 चौकारांचा समावेश होता. या तिघांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 8 बाद 393 धावा चोपल्या आणि पहिल्या दिवशी डाव घोषित केला.

यावेळी ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना दिग्गज फिरकीपटू नेथन लायन (Nathan Lyon) चमकला. त्याने 29 चेंडूत 149 धावा खर्च करत 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त जोश हेजलवूड याने 2, तर स्कॉट बोलँड आणि कॅमरून ग्रीन यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली. (cricketer joe root hit reverse scoop for a six against scott boland see video)

महत्वाच्या बातम्या-
प्रेम हे! लग्नानंतर चांगलाच चमकला ऋतुराज, पत्नीचा जर्सी नंबर घालून ठोकलं झंझावाती अर्धशतक
महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रत्नागिरी जेट्सची सुरेख सुरुवात, सोलापूर टायटन्सला चारली पराभवाची धूळ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---